आमदार वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण, ठाकरेंवर टीकास्त्र

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | लोकसभा निवडणुकीचे सर्वत्र वारे वाहत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. रविवारी रात्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. वायकरांना आपल्या पक्षात घेताना एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री आणि उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मागील काळात अडीच वर्षात राज्यात असलेल्या सरकारने अनेक आमदार, खासदारांची कामे प्रलंबित ठेवल्याने ते काम करणाऱ्या सरकारमध्ये येत आहेत, असे शिंदेंनी सांगितले.

रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी रविवारी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मनीषा वायकर तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

पक्षप्रवेशावेळी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक कमलेश राय, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे संघटक उदय सावंत तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. एकिकडे उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत असताना वायकरांनी त्यांची सोडलेली साथ उबाठासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर ईडीच्या चौकशीमुळे ते तिकडे गेले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, सच्चे शिवसैनिक, जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार, मुंबई महानगरपालिकेचे चार वेळा स्थायी समिती सभापती असलेले रवींद्र वायकर यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल आनंद होत आहे. त्यांचे मी खऱ्या शिवसेनेत स्वागत करतो.

 

Eknath Shinde यांचे ठाकरेंवर टीकास्त्र

उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात राज्यात असलेल्या सरकारने अनेक आमदार, खासदारांची कामे प्रलंबित ठेवल्याने त्यांना काम करणाऱ्या सरकारमध्ये प्रवेश करावा लागला. त्यांच्या विभागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील ते नक्की घेतले जातील. मुंबई महानगरपालिका, त्यानंतर विधानसभा आणि पक्षाचे काम करण्याचा देखील वायकर यांना प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवाचा शिवसेनेला नक्की उपयोग होईल.

दरम्यान, उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर फिरत आहेत. त्यांनी नुकतीच अमोल किर्तीकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. यावरून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या संजय निरूपमांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली. अद्याप मविआचे जागावाटप झालेले नाही.

News Title- MLA Ravindra Waikar joins Shiv Sena, Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या –

अखेरच्या चेंडूवर सनसनाटी निर्णय! 1 धाव अन् बरेच काही; स्मृतीसह खेळाडूंचे डोळे पाणावले

फक्त एका कारणामुळे TMC ने युसूफ पठाणला तिकीट दिलं; बड्या नेत्याविरूद्ध मैदानात!

ऑलिम्पिकचं तिकीट गमावताच कुस्तीपटू बजरंग पुनियाचं धक्कादायक कृत्य!

धक्कादायक! अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

‘खरंतर लक्ष्यानेच स्वतःचं आयुष्य स्वतः संपवलं…’; भावाने केला अत्यंत धक्कादायक खुलासा