अजित पवारांना सर्वात मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता पुन्हा शरद पवार गटात जाणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nilesh Lanke | राज्याच्या राजकारणामध्ये मोठा ट्वीस्ट निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली असल्याने आता काका पुतणे यांच्यात लढत निर्माण होणार आहे. काही नेते आणि आमदार अजित पवार गटामध्ये आहेत. अशातच आता अजित पवार गटामध्ये असणारा नेता आता शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. अजित पवार गटातील नेते निलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार यांच्यासोबत येणार असल्याची शक्यता आहे.

निलेश लंके शरद पवार गटात करणार प्रवेश करणार

अहमदनगर दक्षिण विभागातून निलेश लंके (Nilesh Lanke) यांना शरद पवार गटातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे आमदार सुजय विखे-पाटील विरूद्ध निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा आहे. याबाबतची माहिती ही शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अधिकृतपणे दिली आहे.

अमोल कोल्हे यांच्याकडून ऑफर

नगरमध्ये निलेश लंके (Nilesh Lanke) प्रतिष्ठान आयोजित महानाट्याच्या वेळी खासदार अमोल कोल्हे यांनी लंके यांना महाविकास आघाडीमध्ये य़ेऊन निवडणूक लढण्याचं निमंत्रण दिलं होतं. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तक्ताला घाम फोडणाऱ्या नेत्यानं आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावं, असं कोल्हे म्हणाले.

नगर दक्षिणमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी वाजवलीच पाहिजे. त्यानंतर निलेश लंके यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. यामुळे निलेश लंके शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहे. अजित पवार गटाला मोठा धक्का मिळणार आहे.

सोमवारी निलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. ते आता शरद पवार गटामध्ये ते अधिकृतपणे प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दक्षिण नगरमध्ये निलेश लंके यांना उमेदवारी मिळवण्याची शक्यता आहे.

News Title – Nilesh Lanke Will Enter in Sharad Pawar group

महत्त्वाच्या बातम्या  

“5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता…”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

गुन्हेगारीला आळा बसणार; गृहमंत्री फडणवीसांची मुंबईत मोठी घोषणा

“अशा पद्धतीने आघाड्या चालतात का?”, वंचितनं व्यक्त केली खदखद, मविआला दिला सल्ला!

शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याच्या मुलाला ठाकरेंकडून उमेदवारी; मविआमध्ये वादाची ठिणगी!

आमदार वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण, ठाकरेंवर टीकास्त्र