“5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता…”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खूपदा मनातली सल बोलून दाखवली आहे. त्यांना भाजपकडूनच बऱ्याचदा डावलण्यात आल्याचं म्हटलं जातं. आता लवकरच लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. त्यामुळे बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अशातच त्यांनी बीडमध्येच एका सभेत मोठं वक्तव्य केल्याने राजकारणात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. 5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे वक्तव्य अतिशय सूचक मानलं जात आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

एवढे दिवस वनवास भोगला आहे. बापरे, वनवास म्हटलं की पाच वर्षांचा असावा या कल युगात बाबा! त्या जुन्या काळात होता वनवास 14 वर्षांचा, आम्हाला 5 वर्षंच खूप झाला. का अजून पाहिजे तु्म्हाला? मग तुम्ही आहात ना माझ्यासोबत?, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मला माहीत नाही ईश्वराने माझ्या भाग्यात काय लिहीलं आहे. आत्तापर्यंत जे काही लिहीलं होतं, त्याच्यात तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त मला फार काही मिळालेलं नाही. माझ्या जीवनाबद्दल मी फार काही बोलत नाही. पण मी फार दु:ख, यातना, वेदना, भोगून झालेल्या आहेत. ते सर्व भोगूनही मी चेहऱ्यावर हास्य ठेवते, नको असतानाही चेहरा हसरा ठेवते ते केवळ तुमच्यामुळे कार्यकर्त्यांमुळे, असंही त्यांनी म्हटलंय.

तुम्ही नाही तर मला आयुष्यात काही नाही. खड्ड्यात गेलं ते पद-बिद… मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. पण तुमचं प्रेम हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. तुम्हाला चांगला विकास देऊन, सन्मार्ग देऊन, त्या प्रेमाची मी पावती देणार आहे, त्याची परतफेड मी करणार असल्याचं मुंडेंनी म्हटलंय.

माझ्याकडून तुम्हाला मान खाली घालावे लागेल असं मी काहीही कृत्य करणार नाही. असे झाले तर तो माझ्या जीवनातला शेवटचा दिवस असेल, असं पंकजा मुंडे या सभेत म्हणाल्या. सभेमध्ये कार्यकर्त्यांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्या या विधानाची आता जोरदार चर्चा होत आहे.

News Title- Pankaja Munde big statement   

महत्त्वाच्या बातम्या –

शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याच्या मुलाला ठाकरेंकडून उमेदवारी; मविआमध्ये वादाची ठिणगी!

आमदार वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण, ठाकरेंवर टीकास्त्र

अखेरच्या चेंडूवर सनसनाटी निर्णय! 1 धाव अन् बरेच काही; स्मृतीसह खेळाडूंचे डोळे पाणावले

फक्त एका कारणामुळे TMC ने युसूफ पठाणला तिकीट दिलं; बड्या नेत्याविरूद्ध मैदानात!

ऑलिम्पिकचं तिकीट गमावताच कुस्तीपटू बजरंग पुनियाचं धक्कादायक कृत्य!