“अशा पद्धतीने आघाड्या चालतात का?”, वंचितनं व्यक्त केली खदखद, मविआला दिला सल्ला!

Lok Sabha | लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती विरूद्ध महाआघाडी असा सामना रंगणार आहे. अद्याप एकाही पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. पण, सुप्रिया सुळे बारामतीतून लोकसभा लढतील असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे उत्तर-पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर उमेदवार असतील अशी घोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. दोन उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आपली खदखद बोलून दाखवली. वंचित मविआचा भाग असला तरी अद्याप जागावाटप न झाल्याने पेच निर्माण झाला आहे.

वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत मविआतील घटक पक्षांना सल्ला दिला आहे. “महाविकास आघाडीमध्ये लफडा आहे, हे खरे नाही का? लफडा असूनही, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीविषयी सकारात्मक आहे. प्रत्येक पक्ष ज्या पद्धतीने आपापले उमेदवार जाहीर करत आहे, हे तुम्हाला मान्य आहे का?”, असा प्रश्न वंचितने उपस्थित केला.

वंचितनं व्यक्त केली खदखद

तसेच सुप्रिया सुळे यांना बारामतीतून आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे) उत्तर-पश्चिम मुंबईमधून अमोल किर्तीकर यांना उमेदवार म्हणून घोषित केले. अशा पद्धतीने आघाड्या चालतात का? मविआतील पक्ष आघाडी म्हणून नाही तर एकटेच निर्णय का घेत आहेत? तुम्ही आम्हाला सर्व अंतर्गत चर्चा आणि बैठकांपासून दूर ठेवत आहात. पण, निदान चर्चा करून आणि आघाडी म्हणून उमेदवार जाहीर करा. आम्हाला आशा आहे की, वरील मुद्द्यांवर सर्वजण एकत्र बसून समाधान निघेल. आम्ही पुन्हा अधोरेखित करत आहोत की, आम्ही महाविकास आघाडीबद्दल सकारात्मक आहोत, अशी भूमिका वंचितने मांडली.

उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. अमोल यांचे वडील गजानन कीर्तिकर येथील विद्यमान खासदार आहेत. पण ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहेत. ठाकरेंनी अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर करताच काँग्रेसच्या संजय निरूपमांनी त्यांच्यावर टीका केली.

 

Lok Sabha निवडणुकीची रणधुमाळी

दुसरीकडे, बारामती हा मतदारसंघ आधीपासूनच शरद पवारांचा गड राहिला आहे. येथून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा लोकसभेसाठी मैदानात असणार आहेत. पण आम्हाला विचारात न घेता निर्णय घेतला जात असल्याचे वंचितने सांगितले. अद्याप वंचित आणि मविआच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा झालेली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली नसली तरी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सत्ताधारी भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, तर काँग्रेसने 39 उमेदवारांची घोषणा केली आहे. दोन्हीही राष्ट्रीय पक्षांनी अद्याप महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही.

News Title- vanchit bahujan aghadi advises Mahavikas Aghadi in the wake of the Lok Sabha elections
महत्त्वाच्या बातम्या –

शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याच्या मुलाला ठाकरेंकडून उमेदवारी; मविआमध्ये वादाची ठिणगी!

आमदार वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण, ठाकरेंवर टीकास्त्र

अखेरच्या चेंडूवर सनसनाटी निर्णय! 1 धाव अन् बरेच काही; स्मृतीसह खेळाडूंचे डोळे पाणावले

फक्त एका कारणामुळे TMC ने युसूफ पठाणला तिकीट दिलं; बड्या नेत्याविरूद्ध मैदानात!

ऑलिम्पिकचं तिकीट गमावताच कुस्तीपटू बजरंग पुनियाचं धक्कादायक कृत्य!