चेक रिपब्लिकची Krystyna Pyszkova ठरली ‘मिस वर्ल्ड 2024’

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Krystyna Pyszkova | मिस वर्ल्ड 2024 चा दिमाखदार महाअंतिम सोहळा नुकताच मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये पार पडला. यावेळी मुंबईत 71व्या मिस वर्ल्डचे आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये 24 वर्षीय चेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हा (Krystyna Pyszkova) हिला मिस वर्ल्डचा मुकुट देण्यात आला.

115 देशांतील स्पर्धकांशी झालेल्या स्पर्धेत क्रिस्टीना विश्वसुंदरी ठरली. गेल्या वर्षीची मिस वर्ल्ड 2022 ची विजेती पोलंडची कॅरोलिना बिलावस्का हिने क्रिस्टीनाला विश्वसुंदरीचा मुकुट दिला. याचे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Krystyna Pyszkova ठरली ‘विश्वसुंदरी’

मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेत 12 जजच्या पॅनेलमध्ये चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला, क्रिती सॅनन, पूजा हेगडे, क्रिकेटर हरभजन सिंग यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता. तर करण जोहर आणि माजी मिस वर्ल्ड मेगन यंग यांनी हा शो होस्ट केला होता. कार्यक्रमामध्ये गायक शान, नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांनी स्टेजवर परफॉर्मन्स दिला.

मिस इंडिया 2022 ची विजेती सिनी शेट्टी हिने मिस वर्ल्ड 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. ती यंदाची पक्की दावेदार समजली जात होती. मात्र तिला टॉप 4 मध्ये स्थान मिळवता आले नाही आणि ती शर्यतीतून बाहेर पडली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss World (@missworld)

Krystyna Pyszkova आहे तरी कोण?

मिस वर्ल्ड 2024 ची विजेती क्रिस्टिना पिस्कोव्हाचा जन्म 19 जानेवारी 1999 मध्ये झाला. क्रिस्टिना अजूनही वकिलीचं शिक्षण घेत आहे. अभ्यास करताना मॉडेलिंगमध्ये तिला रुची निर्माण झाली. क्रिस्टिनाची स्वत:ची संस्था आहे. ‘क्रिस्टिना पिस्कोव्हा फाऊंडेशन’ (Krystyna Pyszkova Foundation) असं या संस्थेचं नाव आहे. टांझानियातील वंचित मुलांसाठी तिने अनेक चांगली कामे केली आहेत. गरीब विद्यार्थ्यांसाठी तिने शाळा सुरू केली आहे. ही शाळा क्रिस्टिना स्वत: चालवते.

सध्या सोशल मीडियावर फक्त क्रिस्टिना पिस्कोव्हाचीच चर्चा रंगत आहे. तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. तिच्याबाबतीत गुगलवर सर्वाधिक सर्च केलं जात आहे. भारतात झालेल्या या सोहळ्याचे फोटो आता व्हायरल होत आहेत.

News Title- Miss World 2024 Winner Krystyna Pyszkova

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

अश्विनची रेकॉर्डब्रेक कामगिरी, जे कोणी करून दाखवलं नाही ते केलं

जय शहा यांची मोठी घोषणा, कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस

‘पैशांसाठी राज कुंद्रासोबत लग्न केलं?’, शिल्पा शेट्टीचं ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर

बारामतीत नणंद भाऊजय यांची गळाभेट, व्हिडीओ व्हायरल