“दोन मोठी माणसं बोलत असताना तोंड शांत ठेवलेलं बरं”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amol Mitakri | शरद पवार गट आणि अजित पवार गटातील नेते अजूनही एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitakri) यांनी शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. रोहित पवार यांनी अजित पवार आणि तिकडे शरद पवार हे दोन मोठी माणसं बोलत असताना आपलं तोंड शांत ठेवलेलं बरं, असा सल्ला दिला आहे. (Amol Mitakri)

राज्याच्या राजकारणामध्ये अनेक ट्वीस्ट निर्माण होताना दिसत आहेत. अजित पवार गटाचे नेते आणि आमदार निलेश लंके हे आता शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. निलेश लंके शरद पवारांसोबत येणार असल्यास त्याचं स्वागत आहे, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. यावर अमोल मिटकरी (Amol Mitakri) यांनी रोहित पवार यांना दोन मोठी माणसं बोलत असताना तोंड शांत ठेवलेलं चांगलं असल्याचं अमोल मिटकरी (Amol Mitakri) म्हणाले.

निलेश लंके शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी यावर कोणतंही ठोस उत्तर दिलं नाही. त्यामध्ये सस्पेन्स ठेवला आहे. रोहित पवार म्हणाले की ते जर शरद पवार साहेबांसोबत येणार असतील तर त्यांचं स्वागत असेल. यावरून अमोल मिटकरी यांनी रोहित पवार यांना खडेबोल सुनावले आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

स्वत: शरद पवार यांनी चर्चेचं खंडन केलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाचं कुठं काही दिसत नाही. लोकसभेसाठी ते चर्चेत आहे हे मी गेल्या काही दिवसांपासून ऐकत आहे. माझ्या माहितीप्रमाणे निलेश लंके यांना मोठं पाठबळ आहे. मला तरी वाटतंय की लंके साहेब तिकडं जाणार नाहीत, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

बंद दाराआड चर्चा

काही वेळानंतर पुण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भेटीस निलेश लंके गेले होते. त्यावेळी काहीवेळ बंद दाराआड चर्चा झाली होती. ही चर्चा नेमकी कशा संदर्भात होती, याबाबत महिती अद्यापही समोर आली नाही.

दोन दिवसांपासून निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम करत शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र अद्यापही तसं काही दिसून आलं नाही.

News Title – Amol Mitkari On Rohit pawar About Nilesh Lanke

महत्त्वाच्या बातम्या

देशातील सर्वात मोठी बातमी; निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारची मोठी घोषणा

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?

सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता

धोनीच्या चाहत्यांना धक्का?; हा खेळाडू होणार CSK चा कर्णधार?

अजित पवारांना सर्वांत मोठा धक्का बसण्याची शक्यता!