सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीआधी (Lok Sabha Elections 2024) देशात सीएए कायदा (CAA Law) लागू करणार असल्याचे शाह म्हणाले होते. त्यानंतर आता गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर आलं आहे.

केंद्र सरकार ‘CAA’ चे नियम जाहीर करणार

केंद्र सरकार आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी देशात CAA लागू करणार असल्याची माहिती आहे. आज याबाबतची अधिसूचना केंद्र सरकार जारी करू शकते. यानंतर आजपासून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू होऊ शकतो.

पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान कोणती मोठी घोषणा करणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इस्रो, सीएए किंवा निवडणुकीबाबत काही घोषणा करतात का? याकडे लक्ष लागून आहे.

सीएएचे नियम लागू करण्यासाठी अंतिम प्रक्रिया सुरु आहे. काही आठवड्यांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाने यासाठी या कायद्याचे नियम बनवण्यासाठी एक समिती बनवली होती. नागरिकत्व सुधारणा विधेयक 11 डिसेंबर 2019 मध्ये संसदेत पारित करण्यात आले होते. त्यानंतर एका दिवसात राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

सीएएच्या कायद्यामुळे, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानतून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिश्चन समुदायातील अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी मदत होणार आहे.

केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा पारीत केला होता. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 ची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत हा कायदा लागू केला जाईल असं अमित शाह यांनी भाषणात वारंवार सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

धोनीच्या चाहत्यांना धक्का?; हा खेळाडू होणार CSK चा कर्णधार?

अजित पवारांना सर्वांत मोठा धक्का बसण्याची शक्यता!

“फडणवीस तुम्ही चुकीच्या माणसाला…”; जरांगेंचा फडणवीसांना गंभीर इशारा

‘या’ 5 गोष्टींमुळे तुम्हीही व्हाल झटपट श्रीमंत!

“ऐश्वर्याशी ब्रेकअप झाल्यानंतर..”, विवेक ओबेरॉयने केला मोठा खुलासा