धोनीच्या चाहत्यांना धक्का?; हा खेळाडू होणार CSK चा कर्णधार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | आयपीएल 2024 चा हंगाम (IPL 2024) येत्या 22 मार्चपासून सुरू होणार आहे. यंदाच्या हंगामातील पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरमध्ये होणार आहे. आयपीएलसाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. अशातच माजी खेळाडूने एक मोठं वक्तव्य केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

भारताचा माजी फलंदाज अंबाती रायडू याने मोठं वक्तव्य केलं आहे. अंबाती रायडूने गेल्या वर्षी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने आता रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

अंबाती रायडूचं मोठं विधान

यंदाच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवलं आहे. या निर्णयामुळे मुंबईचे चाहते बरेच नाराज झाले आहेत. अजूनही चाहत्यांना हा निर्णय मान्य नाही. यामुळेच सोशल मीडियावर झपाट्याने मुंबईचे फॉलोवर्स कमी झाले. अशातच अंबाती रायडू याने केलेल्या वक्तव्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.

“मला असं वाटतंय की, मुंबईने यावर्षी थोडीशी जास्तच घाई केली आहे. यावर्षी रोहितला कर्णधार म्हणून कायम ठेवायचं होतं. हार्दिक यावर्षी खेळाडू म्हणून खेळून पुढच्या वर्षी ( IPL 2024 ) संघाचं नेतृ्त्व करु शकला असता. कारण रोहित अजूनही भारतीय संघाचा कर्णधार आहे. मला तरी हेच वाटतंय की, जरा घाई झाली आहे.”, असं एका मुलाखतीमध्ये अंबाती रायडू म्हणाला.

रोहित CSK चा कर्णधार होणार?

तसंच पुढे तो म्हणाला की, भविष्यात रोहित शर्माला चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना पाहण्यास मला आवडेल. रोहित अजूनही 5-6 वर्ष आयपीएल खेळू शकतो. धोनी लवकरच आयपीएलमधून ( IPL 2024 ) निवृत्त होऊ शकतो. त्यामुळे रोहित चेन्नईकडून खेळताना संघाचं नेतृत्व करु शकतो, असं वक्तव्य अंबाती रायडू याने केलं आहे. या वक्तव्याची आता चर्चा होऊ लागली आहे.

दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा कसा खेळणार, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. मात्र अंबाती रायडूच्या वक्तव्यामुळे आता क्रिकेट विश्वात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. भविष्यात ही गोष्ट घडूही शकते, असंही आता म्हटलं जात आहे.

News Title :  IPL 2024 Big statement of Ambati Rayudu

महत्त्वाच्या बातम्या-

डबल महाराष्ट्र केसरी करणार उद्धव ठाकरे गटात प्रवेश!

“5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता…”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

अजित पवारांना सर्वात मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता पुन्हा शरद पवार गटात जाणार

गुन्हेगारीला आळा बसणार; गृहमंत्री फडणवीसांची मुंबईत मोठी घोषणा

“अशा पद्धतीने आघाड्या चालतात का?”, वंचितनं व्यक्त केली खदखद, मविआला दिला सल्ला!