अजित पवारांना सर्वांत मोठा धक्का बसण्याची शक्यता!

Ajit Pawar | आगामी लोकसभा निवडणुकांमुळे देशासह राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकारणात विविध घडामोडी दिसून येत आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना सर्वांत मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा होत आहे. त्यांचा विश्वासू नेता त्यांची साथ सोडणार आहे.

आजच (11 मार्च) अजित पवार यांचे विश्वासू आमदार निलेश लंके त्यांची साथ शरद पवार यांच्या गटात जाणार, असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे.

आमदार निलेश लंके अजित दादांची साथ सोडणार?

आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहे. लंके यांना नगर दक्षिणमधून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून सुजय विखे पाटील याठिकाणी उमेदवार असणार आहेत. त्यांच्याविरुद्ध आता महाविकास आघाडीतून निलेश लंके अशी लढत होण्याची शक्यता आहे.

निलेश लंके यांना खासदार अमोल कोल्हे यांनीही जाहीर आमंत्रण दिलं होतं. अहमदनगरला निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित महानाट्याच्या वेळी कोल्हे यांनी महाविकास आघाडीत येऊन तुतारी घेऊन निवडणूक लढण्याचं निमंत्रण दिलं होतं. आता प्रशांत जगताप यांनीही याचे संकेत दिले आहेत.

निलेश लंके नगरमध्ये मविआकडून लढणार?

त्यामुळे अजित पवारांना (Ajit Pawar) मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. दक्षिण अहमदनगरमधून ते लोकसभेसाठी इच्छुक होते. पण अजित पवार गटाला तीन ते चारच जागा मिळण्याच्या सध्या चर्चा होत आहेत.

त्यामुळे लंके आता मविआकडून लढण्याची शक्यता आहे. त्यातच निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. तर दुसरीकडे खासदार सुजय विखे यांची पत्नी धनश्री विखेही प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होताना दिसून आल्या. त्यामुळे राजकारणात आता अनेक घडामोडी घडून येत आहेत.

News Title- Ajit Pawar group MLA Nilesh Lanke will go to Sharad Pawar group

महत्त्वाच्या बातम्या –

शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याच्या मुलाला ठाकरेंकडून उमेदवारी; मविआमध्ये वादाची ठिणगी!

आमदार वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण, ठाकरेंवर टीकास्त्र

अखेरच्या चेंडूवर सनसनाटी निर्णय! 1 धाव अन् बरेच काही; स्मृतीसह खेळाडूंचे डोळे पाणावले

फक्त एका कारणामुळे TMC ने युसूफ पठाणला तिकीट दिलं; बड्या नेत्याविरूद्ध मैदानात!

ऑलिम्पिकचं तिकीट गमावताच कुस्तीपटू बजरंग पुनियाचं धक्कादायक कृत्य!