निलेश लंके अजित पवारांची साथ सोडणार?; शरद पवार स्पष्टच बोलले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad pawar | आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आता तोंडावर आली आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad pawar) गटामध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत शरद पवार (Sharad pawar) यांना पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये विचारलं असताना शरद पवार (Sharad pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या अजित पवार गटामध्ये शरद पवार यांच्याहून अधिक आमदार आहेत. तर शरद पवार गटामध्ये अजित पवार गटाहून अधिक खासदार आहेत. तसेच अजित पवार गटामध्ये असणारे निलेश लंके आता शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत, मात्र शरद पवार (Sharad Pलawar) यांनी याबाबत थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

पुण्यामध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांना निलेश लंके आपल्या बाजूनं येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. यावेळी बोलत असताना शरद पवार म्हणाले की, ही चर्चा मी तुमच्याकडूनच ऐकली आहे. असे अनेक लोकं आहेत सगळ्यांना हे विचारत बसणार का? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

ईडीवर भाष्य

शरद पवार यांनी रोहित पवार यांच्यावरील ईडी प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे. रोहित पवार यांच्याबाबतीत निम्म्याहून अधिक कारखाने पंचवीस कोटींहून कमी रकमेला विकले गेले आहे. रोहित पवार यांच्या कंपनीने कारखाना पन्नास कोटींना विकला गेला. ईडीने पंचवीस हजार केसेस पैकी केवळ पंचवीस केसेसचा निकाल लावला. किती दोषी आढळले आहेत, त्यांचे प्रमाण शुन्य टक्क्यांहून कमी आहे, असं पवार म्हणाले.

ईडीची कारवाई केलेले सर्वच विरोधी पक्षातील नेते आहेत. ईडीची कारवाई केलेला भाजप पक्षामधील एकही नेता नाही, असं शरद पवार म्हणाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या सत्तेच्या काळामध्ये काँग्रेसने ईडीचा गैरवापर केला नव्हता त्यावेळी ईडीच्या कारवाया केलेले काँग्रेसचे चार आणि भाजपचे तीन नेते होते, असंही त्यांनी म्हटलंय.

शरद पवार म्हणाले की, ईडीचा उपयोग करत दहशत निर्माण करण्यात येत आहे, असं शरद पवार म्हणाले. त्यानंतर शरद पवार यांना रोहित पवार यांना अटक होणार का? असा प्रश्न विचारला असता, त्यावर शरद पवार म्हणाले की भरवसा नाही. कारण अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती.

News Title – Sharad Pawar On Nilesh lanke

महत्त्वाच्या बातम्या

डबल महाराष्ट्र केसरी करणार उद्धव ठाकरे गटात प्रवेश!

“5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता…”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

अजित पवारांना सर्वात मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता पुन्हा शरद पवार गटात जाणार

गुन्हेगारीला आळा बसणार; गृहमंत्री फडणवीसांची मुंबईत मोठी घोषणा

“अशा पद्धतीने आघाड्या चालतात का?”, वंचितनं व्यक्त केली खदखद, मविआला दिला सल्ला!