“घरी हेच शिकवलं जातं का?”, चाहत्याचा आक्षेर्पाह शब्द अन् पाकिस्तानी खेळाडू भडकला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mohammad Amir | पाकिस्तानी खेळाडू नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या शेजारील देशात पाकिस्तान सुपर लीग खेळवली जात आहे. (Mohammad Amir Fights With Fan) पाकिस्तान सुपर लीगमध्ये रविवारी क्वेटा ग्लॅडिएटर्सने लाहोर कलंदर्सचा पराभव केला. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वातील लाहोरने मागील दोन हंगामाचे जेतेपद पटकावले पण यंदा त्यांना प्लेऑफमध्येही प्रवेश मिळवता आला नाही. या सामन्यादरम्यान एक नाट्यमय घडामोड घडली. क्वेटा ग्लॅडिएटर्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर प्रेक्षकांवर संतापल्याचे पाहायला मिळाले. आमिरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये एका चाहत्याने मोहम्मद आमिरला फिक्सर म्हणत डिवचले. यानंतर वेगवान गोलंदाजाचा पार चढला. चाहत्याचा शब्द कानावर पडताच आमिर थांबला अन् त्याला खडेबोल सुनावले. तो संबंधित चाहत्याशी भिडला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले. खरं तर फिक्सिंगमुळे आमिरवर काही काळ बंदी घालण्यात आली होती.

पाकिस्तानी खेळाडू भडकला

यानंतर परिस्थिती इतकी बिघडली की शेजारी उभ्या असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. यानंतर हे प्रकरण शांत झाले. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मोहम्मद आमिर 2010 मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये वादात अडकला होता. त्यानंतर आयसीसीने या वेगवान गोलंदाजावर बंदी घातली होती.

खरं तर झाले असे की, मोहम्मद आमिर प्रेक्षकांच्या समोरून जात असताना अनेकांनी आमिर… आमिर अशा घोषणा दिल्या. अशातच एका चाहत्याने फिक्सर अशा घोषणांचा पाऊस पडला. हे ऐकताच आमिर माघारी फिरून प्रेक्षकांच्या दिशेने आला. त्याने संबंधित चाहत्याला सुनावताना म्हटले की, घरून हेच शिकून येतोस का. घरी हेच शिकवले जाते का?.

 

Mohammad Amir चा संताप

क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यातील सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, मोहम्मद आमिरच्या क्वेटा ग्लॅडिएटर्सने लाहोर कलंदर्सचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लाहोर कलंदर्सने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 166 धावा केल्या. अब्दुल्ला शफीक आणि शाहीन आफ्रिदी यांनी लाहोरसाठी शानदार खेळी केली.

प्रत्युत्तरात क्वेटा ग्लॅडिएटर्सने 20 षटकांत 4 गडी गमावत 169 धावा करत सामना जिंकला. या विजयानंतर क्वेटा ग्लॅडिएटर्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. या पराभवासह लाहोरचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत बाहेर झाला. यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच शाहीनच्या नेतृत्वातील संघाने निराशाजनक कामगिरी केली.

News Title- Mohammad Amir angry on fan during pakistan super league season 9
महत्त्वाच्या बातम्या –

“दोन मोठी माणसं बोलत असताना तोंड शांत ठेवलेलं बरं”

चेक रिपब्लिकची Krystyna Pyszkova ठरली ‘मिस वर्ल्ड 2024’

‘वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानं वायकर आता स्वच्छ होतील’; संजय राऊत भडकले

निलेश लंके अजित पवारांची साथ सोडणार?; शरद पवार स्पष्टच बोलले

“मी मुंडक्यावर बसून आरक्षण घेत असतो”; मनोज जरांगे कडाडले