सचिन तेंडुलकरची आमिर खानसाठी बॅटिंग; अभिनेत्याला होणार मोठा फायदा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sachin Tendulkar | किरण रावचा चित्रपट ‘लापता लेडीज’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने चाहत्यांच्या भेटीला आल्यापासून मोठ्या पडद्यावर खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटाने आपल्या आशय आणि संकलनाने प्रेक्षकांच्या हृदयावर आपली छाप सोडली. ‘लापता लेडीज’ प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. (Laapataa Ladies Sachin Tendulkar Review) आता तर सेलिब्रिटीही सोशल मीडियावर या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. अलीकडेच महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही किरण राव-आमिर खानचा हा चित्रपट पाहिला.

एवढेच नाही तर सचिनने चित्रपटाचा रिव्ह्यूही चाहत्यांशी शेअर केला आहे. आमिर खानच्या प्रोडक्शनमध्ये बनलेला ‘लापता लेडीज’ हा चित्रपट लोकांना भुरळ घालत आहे. सचिन तेंडुलकरने एकप्रकारे हा चित्रपट पाहण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे. त्याने चित्रपटाचे कौतुक केले असून त्याची कथा मांडण्याचा प्रयत्न केला.

क्रिकेटपटूला ‘लापता लेडीज’ची भुरळ

सचिनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर चित्रपटाचा रिव्ह्यू देताना म्हटले की, हा एक मोकळ्या मनाचा चित्रपट आहे… ज्याची नाळ भारतातील एका छोट्या शहरासोबत जोडली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांशी वेगवेगळ्या बाबतीतून संवाद साधतो. ‘लापता लेडीज’ चित्रपटाची हृदयस्पर्शी कथा, पॉवरहाऊस परफॉर्मन्स आणि या चित्रपटातील साधेपणा मला आवडला. या चित्रपटाने एक सामाजिक संदेश दिला आहे.

प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या प्रोडक्शनखाली तयार झालेला ‘लापता लेडीज’ हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण रावने केले आहे. चित्रपटात रवी किशनसोबत नितांशी गोयल, प्रतिभा रंता, छाया कदम, नितांशी गोयल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

Sachin Tendulkar कडून कौतुक

खरं तर अवघ्या 5 लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 7 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होतो की नाही हे पाहण्याजोगे असेल. सचिनने चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर ‘लापता लेडीज’ला आणखी प्रसिद्धी मिळाली आहे.

दरम्यान, लापता लेडीज हा चित्रपट आमिर खान प्रोडक्शन आणि किंडलिंग प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनवला गेला आहे, ज्याची स्क्रिप्ट बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट 1 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

News Title- former cricketer Sachin Tendulkar on Laapataa Ladies movie review
महत्त्वाच्या बातम्या –

“घरी हेच शिकवलं जातं का?”, चाहत्याचा आक्षेर्पाह शब्द अन् पाकिस्तानी खेळाडू भडकला

पांड्याच्या नेतृत्वात रोहित खेळणार नाही? IPL सुरू होण्यापूर्वी मोठी अपडेट समोर

“दोन मोठी माणसं बोलत असताना तोंड शांत ठेवलेलं बरं”

चेक रिपब्लिकची Krystyna Pyszkova ठरली ‘मिस वर्ल्ड 2024’

‘वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानं वायकर आता स्वच्छ होतील’; संजय राऊत भडकले