“पाकिस्तानी हिंदू आता मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतील”, क्रिकेटपटूने CAA वरून मानले आभार!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

CAA | भारत सरकारने सोमवारी CAA कायद्याच्या अंमलबजावणीची घोषणा केली आहे. या अंतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळणे सोपे होणार आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले असून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत देखील केले आहे. भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) कायदा लागू करण्यात आला आहे. मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मोठा निर्णय घेतला.

गृह मंत्रालयाने CAA कायद्याच्या अंमलबजावणीची अधिकृत घोषणा केली आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळणे कसे सोपे होईल हा आहे. अशातच पाकिस्तानचा हिंदू क्रिकेटर दानिश कनेरियाने कायद्याच्या अंमलबजावणीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मोदी सरकारची मोठी घोषणा

पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरिया नेहमीच नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारचे समर्थन करत असतो. CAA कायद्याच्या अंमलबजावणीनंतर, कनेरियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, पाकिस्तानी हिंदू आता मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतील. त्यानंतर कनेरियाने आणखी एक पोस्ट करत म्हटले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा अधिसूचित केल्याबद्दल नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार.

दानिश कनेरिया अनेकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, पाकिस्तान सरकार आणि तेथील प्रशासनावर टीका करत असतो. त्याने अनेकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर भेदभावाचा आरोप केला आहे. कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा पाकिस्तानचा फिरकीपटू म्हणून कनेरियाला ओळखले जाते. त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर गंभीर आरोप केले होते.

 

CAA कायदा लागू

दानिश कनेरियाने पाकिस्तानसाठी 61 कसोटी आणि 18 वन डे सामने खेळले आहेत. 2010 मध्ये 43 वर्षीय कनेरियावर मॅच फिक्सिंगचा आरोप झाला होता. मात्र नंतर पोलिसांनी त्याला क्लीन चिट दिली. यानंतर त्याला पाकिस्तान संघात स्थान मिळाले पण त्याला मालिकेत खेळण्यापासून रोखण्यात आले.

अलीकडेच पार पडलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देखील दानिश कनेरिया सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने व्यक्त होत होता. आता CAA बद्दलची त्याची प्रतिक्रिया चर्चेत आहे.

News Title- CAA Act has been implemented and former Pakistan cricketer Danish Kaneria has thanked Prime Minister Narendra Modi and Amit Shah

महत्त्वाच्या बातम्या –

सचिन तेंडुलकरची आमिर खानसाठी बॅटिंग; अभिनेत्याला होणार मोठा फायदा!

“घरी हेच शिकवलं जातं का?”, चाहत्याचा आक्षेर्पाह शब्द अन् पाकिस्तानी खेळाडू भडकला

पांड्याच्या नेतृत्वात रोहित खेळणार नाही? IPL सुरू होण्यापूर्वी मोठी अपडेट समोर

“दोन मोठी माणसं बोलत असताना तोंड शांत ठेवलेलं बरं”

चेक रिपब्लिकची Krystyna Pyszkova ठरली ‘मिस वर्ल्ड 2024’