बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

Vijay Shivtare | बारामती लोकसभा मतदारसंघावर केवळ राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. शिवसेना पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे विजय शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले आहेत.

गेल्या काही वर्षांआधी विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर आता अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्यापासून दूर होत भाजपशी हातमिळवणी केली. मात्र आता विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची इच्छा दर्शवली आहे.

काय म्हणाले विजय शिवतारे?

बारामती लोकसभा निवडणूक मी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याविरोधात लढणार आहे. 5 लाख 80 हजार मतदार पवार कुटुंबियांच्या विरोधात आहे. त्याला पर्याय म्हणून मी लढणार आहे. अजित पवार यांच्या प्रवृत्तीविरोधात आणि सुप्रिया सुळे यांनी काहीच काम न केल्यानं मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काम करणार आहे.

“चिन्ह कोणतं असेल हे अस्पष्ट पण मी लढणार”

बारामती लोकसभेला विजय शिवतारे लढणार आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याविरोधामध्ये दंड थोपटले आहेत. यावर ते ठाम असून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.

“बारामती लोकसभा कोणाचा सातबारा नाही”

सासवडमध्ये पालखी तळावर विजय शिवतारे बोलत असताना त्यांनी पवार कुटुंबियांवर तोफ डागली आहे. अजित पवार यांनी केलेला अपमान हा केवळ विजय शिवतारेंचा नसून संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. अजित पवार या अपमानासाठी इथे येऊन माफी मागणार का? असा सवाल विजय शिवतारे यांनी केला आहे. तसेच बारामती कोणाचा सातबारा नाही, असं म्हणत पवार कुटुंबियांवर हल्ला केला आहे.

5 लाख 80 हजार मतदार पवार कुटुंबियांच्या विरोधात आहे. आरपार लढाई होणार असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे. यामुळे आता दोन पवार विरूद्ध विजय शिवतारे यांच्यात लढत होणार का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये होत आहे.

News Title – Vijay Shivtare Baramati Assemblye Election Against Supriya sule And Sunetra pawar

महत्त्वाच्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता

धोनीच्या चाहत्यांना धक्का?; हा खेळाडू होणार CSK चा कर्णधार?

अजित पवारांना सर्वांत मोठा धक्का बसण्याची शक्यता!

“फडणवीस तुम्ही चुकीच्या माणसाला…”; जरांगेंचा फडणवीसांना गंभीर इशारा

‘या’ 5 गोष्टींमुळे तुम्हीही व्हाल झटपट श्रीमंत!