“फडणवीस यांच्या डोक्याला…”, मनोज जरांगेंचा गंभीर इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये नवनवीन ट्वीस्ट निर्माण होत आहेत. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देत सगेसोयरेची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. यावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी फडणवीस यांना धारेवर धरलं आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे राज्यामध्ये ठिकठिकाणी जात सभा घेत मराठा बांधवांना मार्गदर्शन करत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत. बीडमध्ये जाळपोळ देखील झाली होती त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कपाळाला गुलाल लागू देणार नाही, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

हिंगोलीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीचे नेते जागावाटपाच्या मुद्द्यावरून व्यस्त आहेत. लोकसभा निवडणूक सुरू होण्याआधीच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगेसोयरे अंमलबजावणी करत आरक्षण द्यावं. 10 टक्के आरक्षण हे मराठा समाजाच्या फयद्याचं नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

पुन्हा मराठा एकत्र येणार?

मनोज जरांगे पाटील हे आता पुन्हा एकदा सभा घेणार आहेत. त्यासाठी सर्व मराठा बांधवांनी एकत्र यावं असं मराठा बांधवांना त्यांनी आवाहन केलं आहे. 900 एकरची जागा पाहत मनोज जरांगे पुन्हा एकदा विराट सभा घेणार असल्याचं म्हणाले आहेत.

एसआयटीवर भाष्य

एसआयटी चौकशीवर बोलताना म्हणाले दुध का दुध, पाणी का पाणी होऊ द्या. पण तसं होणार नाही. बारा बलुतेदार असु द्या, गोरगरिब जनता असुद्या, सगळे गुतणार पण मराठे गुतणार नाही कारण मराठे भीतच नाही गुतायला. राज्यामध्ये आता दूषित वातावरण झालं आहे. नाराजीची प्रचंड लाट आली आहे. भावनिक प्रचंड लाट आली आहे, आयुष्यात केलेली चूक किती महागात पडेल हे फडणवीस यांच्या लक्षात येणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना लक्ष केलं आहे.

“आयुष्यभर डोक्याला गुलाल लागू देणार नाही”

राजकीय आयुष्यातून कायम बरबाद होणार. तुम्ही किती खुनशी आहात हे माहितीये. पण मराठे एवढे खुनशी आहेत की आयुष्यभर तुमच्या डोक्याला गुलाल लागू देणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला आहे.

News Title- Manoj Jarange patil On Devendra Fadanvis About Maratha reservationमहत्त्वाच्या बातम्या

‘देवेंद्र फडणवीसांनी मला हा निरोप पाठवला…’; जरांगेंचा मोठा खुलासा

‘राजकुमार येण्याआधी मी अनेकांना…’; तापसी पन्नूच्या वक्तव्याने खळबळ

संजय राऊतांचा वसंत मोरेंना मोलाचा सल्ला, म्हणाले…

नवनीत राणांकडून साडी वाटप, महिलांनी उडवली खिल्ली, म्हणाल्या ‘ही साडी की मच्छरदाणी?’

“शिंदे साहेब शिवतारेंना आवरा नाहीतर…”, अमोल मिटकरी यांचा इशारा