‘देवेंद्र फडणवीसांनी मला हा निरोप पाठवला…’; जरांगेंचा मोठा खुलासा

हिंगोली | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन उपोषण करताना दिसत आहेत. त्यांनी सरकारकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घ्यावं अशी मागणी केली. त्यानंतर सगेसोयरे प्रकरणी अंमलबजावणी करा अशी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मागणी केली. अशात जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

मनोज जरांगेंचा मोठा खुलासा

फडवणीस साहेब, मध्ये जायला भीत नाही. वाघाचे काळीज लागते. आमच्या मराठ्यांचे लोक संरक्षण करायला तयार आहेत. पॉलिसीची गरज नाही. मराठा आरक्षणबद्दल बोलणाऱ्याला मी सोडत नाही. न टिकणारे आरक्षण मी घेत नाही, समाजाशी गद्दारी करू शकत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“मला देवेंद्र फडवणीस निरोप पाठवत आहेत”

सत्तेचा आणि पदाचा गैरवापर किती दिवस करतात ते बघू. मराठ्यांनी पुन्हा ताकतीने एकत्र यायचे आहे. मी त्यांना पुरून उरतो. एव्हडी शक्ती तुम्ही दिली. मला आरे तुरे बोलू नको म्हणून मला देवेंद्र फडवणीस निरोप पाठवत आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.

तुम्ही दिलेलं 10 टक्के आरक्षण घेत नाही. मी जेलमध्ये जायला तयार आहे. मी भ्रष्टाचार केले नाही. मी क्षत्रिय मराठा आहे. आम्हाला लढायचं माहीत आहे. मी मारणार नाही तर आरक्षणाचा गंध लावून येणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

जे 10 टक्के आरक्षण टिकणार नाही, ते समजाला मान्य नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय मागे हटत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कितीही अन्याय केला तरी आरक्षण मिळवणार. माझ्या विरोधात एसआयटी नेमली. मी भ्यायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या 10 पिढ्या गेल्या तरी मी हटत नाही, असं जरांगेंनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘राजकुमार येण्याआधी मी अनेकांना…’; तापसी पन्नूच्या वक्तव्याने खळबळ

संजय राऊतांचा वसंत मोरेंना मोलाचा सल्ला, म्हणाले…

नवनीत राणांकडून साडी वाटप, महिलांनी उडवली खिल्ली, म्हणाल्या ‘ही साडी की मच्छरदाणी?’

“शिंदे साहेब शिवतारेंना आवरा नाहीतर…”, अमोल मिटकरी यांचा इशारा

आयपीएलमध्ये 16 वर्षांमध्ये जे घडलं नव्हतं ते घडलं!