Navneet Rana | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापल्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांची भेट घेताना दिसत आहेत. मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे वाटप देखील होताना दिसत आहे. अमरावतीच्या भाजपच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आपल्या मतदारसंघातील आदिवासी पाड्यात जात साड्या वाटप केल्या आहेत. त्याची सर्वत्र चर्चा आहे.
नवनीत राणांकडून साडी वाटप
राणा (Navneet Rana) दाम्पत्य दरवर्षी होळीला मेळघाट येथील आदिवासी भागात जात साड्या वाटप करतात. यंदा लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये होळी सण आला आहे. आचारसंहितेमुळे यंदा होळीआधीच नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मेळघाट येथे जात साड्या वाटप केल्या आहेत. त्यानंतर आदिवासी महिलांनी साड्या वाटपावर संताप व्यक्त केला आहे.
साडी की मच्छरदाणी आहे?
राणा यांनी आदिवासी महिलांना साडी वाटप केल्यानंतर आदिवासी महिलांनी संताप व्यक्त केला आहे. राणा दाम्पत्यांनी वाटप केलेल्या साड्यांवर आदिवासी महिला म्हणाल्या की ही साडी की मच्छरदाणी आहे? साड्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप आदिवासी महिलांनी राणा (Navneet Rana) दाम्पत्यांना केला.
साडी घ्यायची तर ठिकठाक घ्यायची ना? ही साडी म्हणजे सर्व जाळी, अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे. आमच्या महिलांना ही साडी देण्यात आली ती मच्छरदाणीसारखी आहे. यामध्ये लोकांची काय इज्जत राहिल?, असा सवाल आता महिला आदिवासी यांनी केला आहे.
नवनीत राणा यांना विनंती आहे, मेळघाटमध्ये आदिवासी बांधव आहेत त्यांची दिशाभूल करू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया आदिवासी महिलांनी दिली आहे. हेच साडीवाटप नवनीत राणा यांना महागात पडणार असल्याचं दिसत आहे.
News Title – Navneet Rana Distrubute sarees to melghat Adiwasi women
महत्त्वाच्या बातम्या
आखाड्यात भलतीच कुस्ती! विनेश फोगाटचा राडा; नवख्या खेळाडूकडून दारूण पराभव
CAA म्हणजे नेमकं काय रं भाऊ? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या बाबी!
“पाकिस्तानी हिंदू आता मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतील”, क्रिकेटपटूने CAA वरून मानले आभार!
सचिन तेंडुलकरची आमिर खानसाठी बॅटिंग; अभिनेत्याला होणार मोठा फायदा!
“घरी हेच शिकवलं जातं का?”, चाहत्याचा आक्षेर्पाह शब्द अन् पाकिस्तानी खेळाडू भडकला