Vijay Shivtare | राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची केवळ राज्यामध्येच नाहीतर देशामध्ये चर्चा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असल्याच्या चर्चा आहेत. मात्र पुरंदर तालुक्याचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य केलं, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हल्लाबोल केला आहे.
अमोल मिटकरी नेहमी त्यांच्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. ते सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. बारामती लोकसभेमध्ये माजी आमदार विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. यावर आता अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे.
अमोल मिटकरी यांची पोस्ट
एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही विजय शिवतारे यांना आवरा. त्यांच्या बोलण्यामध्ये हलकटपणाचा कळस आहे. महायुतीसोबत राहुन ते दादांसोबत उन्मत्तपणा करतील तर आमचाही नाईलाज आहे, असं ट्वीट करत अमोल मिटकरी यांनी इशारा दिला आहे.
मा.@mieknathshinde साहेब शिवतारेंना आवरा. त्यांनी बोलण्यात हलकटपणाचा कळस केलाय. महायुती सोबत राहुन जर दादांविरुद्ध बोलण्याचा उन्मत्तपणा करित असतील तर आमचाही नाईलाज होईल..
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 11, 2024
बारामती लोकसभेमध्ये दोघात तिसरा
बारामती मतदारसंघामध्ये नणंद भाऊजय एकमेकींविरोधात लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. एका बाजूला शरद पवार तर दुसऱ्या बाजूला अजित पवार हे बारामती मतदारसंघामध्ये मतदारांना भेट देत आहेत. अशातच पुरंदर तालुक्याचे आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधामध्ये बारामती मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं आहे.
काय म्हणाले विजय शिवतारे?
“लोकांसाठी मी अनेकांशी पंगा घेतला आहे. बारामतीमध्ये सुप्रिया ताई, सुनेत्रा ताई असं चाललं आहे. बारामती काय कोणाचा सातबारा नाही. पुरंदर, भोरचाही खासदार पाहिजे. आम्ही का म्हणून 10-10 वेळा मतदान करायचं? आम्हाला काहीच मिळालं नाही. याठिकाणी विजय शिवतारे यांचा अजित पवार यांनी अपमान केला होता”, असं म्हणत विजय शिवतारे पवार कुटुंबियांवर सासवड येथे सभा घेत कडाडले.
“6 लाख 86 हजार पवारांचं मतदान आहे. 5 लाख 80 हजार मतदान हे विरोधकांचं मतदान आहे. 6 लाख 86 हजार या मतं ही दोघांमध्ये आहेत. तर 5 लाख 80 हजार मतदानात विजय शिवतारे यांचं मतदान असेल”, असं विजय शिवतारे म्हणाले.
News Title – Vijay Shivtare Against Amol Mitkari News Update
महत्त्वाच्या बातम्या
‘मर्यादेच्या बाहेर त्रास सहन…’; वसंत मोरेंच्या पोस्टने खळबळ
आखाड्यात भलतीच कुस्ती! विनेश फोगाटचा राडा; नवख्या खेळाडूकडून दारूण पराभव
CAA म्हणजे नेमकं काय रं भाऊ? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या बाबी!
“पाकिस्तानी हिंदू आता मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतील”, क्रिकेटपटूने CAA वरून मानले आभार!
सचिन तेंडुलकरची आमिर खानसाठी बॅटिंग; अभिनेत्याला होणार मोठा फायदा!