संजय राऊतांचा वसंत मोरेंना मोलाचा सल्ला, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vasant More | मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे माजी नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला राम राम केला असून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सकाळी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमुळे पुण्यातील राजकारणामध्ये काहीतरी ट्वीस्ट घडणार असल्याच्या चर्चा होत्या. नेमकं तसंच झालेलं पाहायला मिळालं आहे.

काय होती पोस्ट?

“एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार ना कोणाकडे अपेक्षा करतो”, अशी पोस्ट वसंत मोरे (Vasant More) यांनी केली. यावर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला राम राम केला यावर मी काय बोलू. त्यांना लोकसभा निवडणूक लढायची असेल तर त्यांनी कोणत्या पक्षाकडून लढलं पाहिजे हे त्यांनी ठरवावं. वसंत मोरे (Vasant More) यांनी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊ नये. वसंत मोरे यांनी शरद पवार यांचं मार्गदर्शन घेतलं असेल तर चुकीचं काय? शरद पवार देशाचे नेते आहेत, असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान मनसेला राम राम केल्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मनसेला राम राम केल्यानंतर मोरेंची पहिली प्रतिक्रिया

पुणे शहरामध्ये वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी ते बोलत असताना भावूक झाले आणि ढसाढसा रडू लागले. मी रात्रभर झोपलो नाही. माझ्यावर पक्षात असताना गंभीर आरोप केल्यानं मी पक्षाच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला असल्याचं ते पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.

माझी आता कुठलीही भूमिका नाही. मी पक्षातील सर्व पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्ष प्राथमिक सदस्यत्व सोडलं आहे. मी संघटनेत नाही. माझी पुढची भूमिका आता पुणेकर ठरवतील, असं त्यांनी सांगितलं.

वसंत मोरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत काम केलं आहे. पुणे शहरामध्ये मनसे पक्षाची बांधणी ही वसंत मोरे यांनी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वसंत मोरे यांच्याहून साईनाथ बाबर यांची अधिक चर्चा होती, यामुळे आता वसंत मोरे यांनी दिलेल्या राजीनाम्याने पुण्याच्या राजकारणामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काय घडेल काय बिघडेल याबाबतचे चित्र लवकर स्पष्ट होईल.

News Title – Vasant More Resign MNS Sanjay Raut Statement

महत्त्वाच्या बातम्या

आयपीएलमध्ये 16 वर्षांमध्ये जे घडलं नव्हतं ते घडलं!

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर!

‘मी रात्रभर झोपलो नाही’; वसंत मोरे ढसाढसा रडले

वसंत मोरेंचा मोठा खुलासा, राजीनामा देण्यामागचं खरं कारण सांगितलं

सर्वात मोठी बातमी! वसंत मोरेंचा राज ठाकरेंना धक्का