पुणे | मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरेंनी (Vasant More) अखेर मनसेला रामराम केला आहे. वसंत मोरेंनी सर्व पदांचा राजीनामा देत मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. यानंतर वसंत मोरेंनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. माध्यमांशी बोलताना वसंत मोरेंना अश्रू अनावर झाले. यावेळी बोलताना वसंत मोरे ढसाढसा रडले. मी रात्रभर झोपलो नाही, असं वसंत मोरेंनी सांगितलं.
“मी रात्रभर झोपलो नाही”
मनसेमध्ये माझ्यावरती सारखे आरोप होत होते. वसंत मोरे (Vasant More) नाराज असल्याचे बातम्या पेरल्या जात होता. पक्षात राहून माझ्या चारित्र्यावर, माझ्या वागणुकीवर आरोप केला जात आहे. यामुळे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय मी घेतला. मी मनसे एवढी वर्ष होते. परंतु कधी व्यक्ती केंद्रीत राजकारण केलं नाही, असं वसंत मोरेंनी सांगितलंय.
माझी आता कुठलीही भूमिका नाही. मी पक्षातील सर्व पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्ष प्राथमिक सदस्यत्व सोडलं आहे. मी संघटनेत नाही. माझी पुढची भूमिका आता पुणेकर ठरवतील, असं त्यांनी सांगितलं.
Vasant More | वसंत मोरेंना कोणत्या पक्षातून ऑफर?
मी येत्या दोन, तीन दिवसांत भूमिका जाहीर करणार आहे. मला कोणत्या पक्षांकडून ऑफर मिळाली का? त्या विषयावर मी आता बोलणार नाही. परंतु दोन तीन दिवसांत मी पुणेकरांशी बोलणार आहे. त्यानंतर निर्णय घेणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो. पण माझ्या बद्दलच्या नकारात्मक गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या गेल्या. वारंवार माझ्यावर काहींनी आरोप केले. वसंत मोरे (Vasant More) नाराज आहे. वसंत मोरे स्वकेंद्रीत राजकारण करतो असं माझ्याबद्दल बोललं गेलं, असंही वसंत मोरेंनी सांगितलंय.
दरम्यान, वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी कळवली आहे. माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारावा अशी विनंती त्यांनी राज ठाकरे यांना पत्रातून केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
वसंत मोरेंचा मोठा खुलासा, राजीनामा देण्यामागचं खरं कारण सांगितलं
सर्वात मोठी बातमी! वसंत मोरेंचा राज ठाकरेंना धक्का
‘मर्यादेच्या बाहेर त्रास सहन…’; वसंत मोरेंच्या पोस्टने खळबळ
आखाड्यात भलतीच कुस्ती! विनेश फोगाटचा राडा; नवख्या खेळाडूकडून दारूण पराभव
CAA म्हणजे नेमकं काय रं भाऊ? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या बाबी!