सर्वात मोठी बातमी! वसंत मोरेंचा राज ठाकरेंना धक्का

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा …, असं म्हणत मनसेला रामराम करत असल्याचं वसंत मोरे यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो… त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो. ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी आज सकाळी फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून वसंत मोरे नाराज असल्याचं स्पष्ट दिसत होतं. आता अखेर त्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

मनसेकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवायची होती. पण माझ्या उमेदवारीबाबत निगेटीव्ह गोष्टी पोहोचवल्या गेल्या. कुठल्याही गोष्टीची छाननी न करता निर्णय घेतले गेले. आता मला कशातच इंटरेस्ट नाही. पक्षातील जे अन्य इच्छुक आहेत, त्यांनी आता निवडणूक लढवावी, असं वसंत मोरे म्हणालेत.

वसंत मोरे यांचं राजीनाम्याचं पत्र

प्रति, मा. श्री राजसाहेब ठाकरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

विषय: माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.

आपणांस सप्रेम जय महाराष्ट्र..!

पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कोंडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.

धन्यवाद..!

आपला विश्वासू, वसंत (तात्या) मोरे कात्रज पुणे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘मर्यादेच्या बाहेर त्रास सहन…’; वसंत मोरेंच्या पोस्टने खळबळ

आखाड्यात भलतीच कुस्ती! विनेश फोगाटचा राडा; नवख्या खेळाडूकडून दारूण पराभव

CAA म्हणजे नेमकं काय रं भाऊ? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या बाबी!

“पाकिस्तानी हिंदू आता मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतील”, क्रिकेटपटूने CAA वरून मानले आभार!

सचिन तेंडुलकरची आमिर खानसाठी बॅटिंग; अभिनेत्याला होणार मोठा फायदा!