वसंत मोरेंचा मोठा खुलासा, राजीनामा देण्यामागचं खरं कारण सांगितलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | मनसेचे नेते वसंत मोरेंनी मोठा (Vasant More MNS) निर्णय घेतला आहे. त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा (Pune Vasant More Resignation) राजीनामा दिला आहे. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

वसंत मोरेंचा मोठा खुलासा

मध्यंतरी शिवतीर्थवर बोलवून वसंत मोरे यांची समजूत सुद्धा काढण्यात आली होती. पण तरीही, त्यांच्या नाराजीच्या चर्चा कानावर ऐकू येत होत्या. अखेर त्यांनी पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी एक पत्र लिहित पक्ष सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.

अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे, असं वसंत मोरे म्हणालेत.

“वारंवार माझ्यावर काहींनी आरोप केले”

मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो. पण माझ्या बद्दलच्या नकारात्मक गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या गेल्या. वारंवार माझ्यावर काहींनी आरोप केले. वसंत मोरे नाराज आहे. वसंत मोरे स्वकेंद्रीत राजकारण करतो असं माझ्याबद्दल बोललं गेलं, असं वसंत मोरे म्हणाले.

एवढी वर्ष मनसेत कधी स्वकेंद्रीत राजकारण केलं नाही. तिथे राहून उगाच माझ्या चारित्र्यावर आरोप होत असतील, तर अशा ठिकाणी न राहिलेलं बरं, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, आज सकाळीच ‘एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो’, अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यानंतर काही तासातच त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! वसंत मोरेंचा राज ठाकरेंना धक्का

‘मर्यादेच्या बाहेर त्रास सहन…’; वसंत मोरेंच्या पोस्टने खळबळ

आखाड्यात भलतीच कुस्ती! विनेश फोगाटचा राडा; नवख्या खेळाडूकडून दारूण पराभव

CAA म्हणजे नेमकं काय रं भाऊ? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या बाबी!

“पाकिस्तानी हिंदू आता मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतील”, क्रिकेटपटूने CAA वरून मानले आभार!