मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांनी सर्वत्र चर्चेत आहे. एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ती तिचा बॉयफ्रेंड बॅडमिंटनपटू मॅथियास बो याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तापसीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. यामुळे ती सध्या चर्चेंचा विषय ठरत आहे.
तापसी पन्नूच्या वक्तव्याने खळबळ
राजकुमारापर्यंत पोहोचण्यापूर्वी मी अनेक बेडकांना किस केलं आहे. पण मी जेव्हा मोठी झाली आणि काम करु लागली तेव्हा हाच तो पुरुष होता… कोणता तरुण नव्हता… तरुण आणि पुरुषामध्ये फार अंतर आहे…, असं तापसी पन्नू (Taapsee Pannu) म्हणालीये.
पूर्वी मी एकटी होते. तेव्हा मला कळलं जेव्हा मी एक पुरुषासोबत राहिल, तेव्हा मी स्वतःला सुरक्षित समजेल… मला माझी स्वतःची कमी किमतीत देखील बोली लावायची नव्हती. कारण ही प्रचंड भावूक भावना आहे. याचा परिणाम फक्त माझ्यावर नाहीतर, माझ्या कुटुंबावर देखील पडणार. माझ्या रोजच्या कामावर पडेल, माझ्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम झाला असता, असं तापसी म्हणालीये.
“मला कोणत्या तरुण मुलासोबत नाहीतर”
मला माहिती मला कोणत्या तरुण मुलासोबत नाहीतर, एका पुरुषासोबत राहायचं आहे, असंही तापसी म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तापसी पन्नू हिची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, शीख आणि ख्रिश्चन धर्माच्या रितीरिवाजानुसार दोघेही लग्न करणार असल्याचंही सांगण्यात आलम. खरं तर मॅथियास बो हा माजी डॅनिश बॅडमिंटनपटू आहे, जो चार वर्षांपूर्वी 2020 मध्ये निवृत्त झाला.
तापसी पन्नूच्या वैयक्तिक जीवनाच्या पलीकडे असलेल्या प्रोफेशनल लाईफबद्दल भाष्य करायचे झाले तर, ती गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शाहरुख खानसोबत ‘डिंकी’ चित्रपटात दिसली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
संजय राऊतांचा वसंत मोरेंना मोलाचा सल्ला, म्हणाले…
नवनीत राणांकडून साडी वाटप, महिलांनी उडवली खिल्ली, म्हणाल्या ‘ही साडी की मच्छरदाणी?’
“शिंदे साहेब शिवतारेंना आवरा नाहीतर…”, अमोल मिटकरी यांचा इशारा