मोठी बातमी! वसंत मोरे यांना ‘या’ पक्षातून थेट ऑफर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vasant More | पुण्याच्या राजकारणामध्ये मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. पुणे शहरामध्ये मनसे पक्षाच्या बांधणीसाठी वसंत मोरे (Vasant More) यांनी अनेक वर्षांपासून काम केलं आहे. पण आता वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत सोड चिठ्ठी दिली आहे. यामुळे पुणे शहराचे राजकारण आता चर्चेचा विषय ठरला आहे.

वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला सोडचिठ्ठी देण्याआधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे मनसेमध्ये अंतर्गत फूट पडणार असल्याची शक्यता वर्तवली. मात्र स्वत: वसंत मोरे (Vasant More) मनसेतून बाहेर पडले आहेत. त्याआधी त्यांनी आपल्या मनातील सल सोशल मीडियावर व्यक्त केली.

वसंत मोरे यांची पोस्ट

“एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार ना कोणाकडे अपेक्षा करतो”, अशी भावूक पोस्ट वसंत मोरे यांनी केली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारपरिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो. पण माझ्या बद्दलच्या नकारात्मक गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या गेल्या. वारंवार माझ्यावर काहींनी आरोप केले. वसंत मोरे नाराज आहे. वसंत मोरे स्वकेंद्रीत राजकारण करतो असं माझ्याबद्दल बोललं गेलं, असं वसंत मोरे म्हणाले.

पक्षात राहून माझ्या चारित्र्यावर, माझ्या वागणुकीवर आरोप केला जात आहे. यामुळे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय मी घेतला. मी मनसेत एवढे वर्ष होतो. परंतु कधी व्यक्ती केंद्रीत राजकारण केलं नाही, असं वसंत मोरे म्हणाले. त्यानंतर आता वसंत मोरे यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ऑफर आल्याची चर्चा आहे.

अजित पवार गटातून ऑफर

वसंत मोरे यांनी घेतलेल्या निर्णयावर आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रूपाली पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “वसंत मोरे यांनी योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करते. लोकहितासाठी काम करणारा नेता वसंत मोरे यांची पक्षामध्ये कुचंबणा होत होती”. त्यानंतर रूपाली पाटील यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे.

News Title – Vasant More Offer From NCP Rupali Patil Statement

महत्त्वाच्या बातम्या 

नवनीत राणांकडून साडी वाटप, महिलांनी उडवली खिल्ली, म्हणाल्या ‘ही साडी की मच्छरदाणी?’

“शिंदे साहेब शिवतारेंना आवरा नाहीतर…”, अमोल मिटकरी यांचा इशारा

आयपीएलमध्ये 16 वर्षांमध्ये जे घडलं नव्हतं ते घडलं!

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर!

‘मी रात्रभर झोपलो नाही’; वसंत मोरे ढसाढसा रडले