लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 3 माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांना संधी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Congress | आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 43 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून त्यात आसाम, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत तीन मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांनाही तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसने मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून विद्यमान खासदार नकुलनाथ यांना पुन्हा तिकीट दिले आहे.

नवी दिल्ली येथे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर एकमत झाले. दुसऱ्या यादीतील या 43 उमेदवारांपैकी 13 उमेदवार ओबीसी प्रवर्गातील आहेत. तर, 10 उमेदवार एससी समाजातील आहेत आणि 9 उमेदवार एसटी समाजातील आहेत. दुसऱ्या यादीतून काँग्रेसने जातीय समीकरणावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. कारण या यादीत 7 जनरल, 13 ओबीसी, 10 एससी, 9 एसटी आणि एका मुस्लिम चेहऱ्याला तिकीट मिळाले आहे.

3 माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांना संधी!

काँग्रेसने आपल्या यादीत मुस्लिम चेहराही उतरवला आहे. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनादिवशी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये राहुल गांधी, शशी थरूर यांच्यासह 39 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. मंगळवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांपैकी 10 उमेदवार राजस्थानमधील आहेत.

काँग्रेसने राजस्थानच्या चुरूमधून राहुल कस्वा यांना तिकीट दिले आहे. तर, बिकानेरमधून गोविंदराम मेघवाल, झुंझुनूमधून ब्रजेंद्र ओला, जोधपूरमधून करणसिंग उचियारडा, जालोर-सिरोहीमधून वैभव गेहलोत, अल्वरमधून ललित यादव, टोंक-सवैधोपूरमधून हरीश चंद्र मीना, भरतपूरमधून संजना जाटव, अन्नानगरमधून संजना जाटव, चीलेनगरमधून उचियाराडा यांना संधी देण्यात आली आहे. रोहन गुप्ता यांना गुजरातमधील अहमदाबाद येथून तिकीट देण्यात आले आहे.

Congress ची दुसरी यादी

मध्य प्रदेशातील टिकमगडमधून पंकज अहिरवार, सिधीमधून कमलेश्वर पटेल, छिंदवाडामधून नकुलनाथ आणि देवासमधून राजेंद्र मालवीय यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच काँग्रेसने आपल्या दुसऱ्या यादीत आसामच्या जोरहाटमधून गौरव गोगोई यांना तिकीट दिले आहे.

दरम्यान, काँग्रेसने दुसऱ्या यादीत मुख्यमंत्र्यांच्या तीन पुत्रांना संधी दिली आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांना मध्य प्रदेशातील छिंदवाडामधून तिकीट मिळाले आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांनाही तिकीट देण्यात आले आहे. 2001 ते 2016 या काळात आसामचे मुख्यमंत्री राहिलेले तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव गोगोई यांचाही काँग्रेसने दुसऱ्या यादीत समावेश केला आहे.

News Title- Congress has announced the second list of 42 candidates for the Lok Sabha Elections 2024
महत्त्वाच्या बातम्या –

‘कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी’; भाजपकडून फाटक्या साड्यांचं वाटप

बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

“फडणवीस यांच्या डोक्याला…”, मनोज जरांगेंचा गंभीर इशारा

मोठी बातमी! वसंत मोरे यांना ‘या’ पक्षातून थेट ऑफर

‘देवेंद्र फडणवीसांनी मला हा निरोप पाठवला…’; जरांगेंचा मोठा खुलासा