रहाणे म्हणजे शिस्त…! शतकाची हुलकावणी पण अजिंक्यच्या कृतीनं जिंकलं मन, VIDEO

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajinkya Rahane | मुंबई आणि विदर्भ यांच्यात रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. खूप वर्षांनंतर प्रथमच एकाच राज्यातील दोन संघ आमनेसामने आहेत. मुंबईच्या संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे मागील काही कालावधीपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. पण, अंतिम सामन्यातील दुसऱ्या डावात मराठमोळ्या रहाणेने दमदार खेळी केली. त्याला शतकाने हुलकावणी दिली असली तरी अजिंक्यची एक कृती क्रीडा विश्वाचे मन जिंकून गेली.

खरं तर भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक स्टार्स झाले आहेत, जे आपल्या खेळासोबतच आपल्या व्यक्तिमत्त्वाने लोकांना भुरळ घालून गेले. टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना शांत अन् संयमी स्वभावासाठी ओळखले जाते. त्यांची ही शैली अनेकांना भावते. क्रिकेटपटूंच्या या यादीत अजिंक्य रहाणेच्या नावाचाही समावेश आहे यात शंका नाही.

अजिंक्यच्या कृतीनं जिंकलं मन

अजिंक्य रहाणे सध्या टीम इंडियातून बाहेर असला तरी क्रिकेटमध्ये मात्र सक्रिय आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्याकडे मुंबईच्या संघाची धुरा आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या फानलमध्ये अजिंक्य रहाणेने मंगळवारी असे काही केले की पुन्हा एकदा चाहत्यांनी त्याचे कौतुक केले.

अजिंक्य रहाणे सध्या मुंबईचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. बुधवारीच मुंबई ट्रॉफी जिंकण्याची दाट शक्यता आहे. कारण मुंबई मजबूत स्थितीत असून विदर्भासमोर धावसंख्येचा डोंगर आहे. पण, रहाणेच्या शिस्तीबद्दल आज आपण भाष्य करत आहोत. रहाणेने विदर्भविरुद्धच्या फायनलमध्ये क्रिकेटला ‘जेंटलमॅन गेम’ का म्हणतात हे दाखवून दिले.

 

Ajinkya Rahane ची खेळभावना

रणजी फायनलच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे 73 धावांवर असताना हर्ष दुबेचा एक चेंडू त्याच्या बॅटची टोकदार धार घेऊन यष्टीरक्षकाकडे गेला. यष्टिरक्षक अक्षय वाडकरने त्याचा सहज झेल घेतला. पण, अजिंक्य रहाणे पंचांनी बाद देण्याची वाट न पाहता पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला तेव्हा चेंडू वाडकरच्या हातात होता.

अंतिम सामना जिंकण्यासाठी मुंबई संघाने विदर्भाला 538 धावांचे तगडे लक्ष्य दिले आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात मुंबईने 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ अवघ्या 105 धावांत गारद झाला. यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात 418 धावांची मोठी धावसंख्या उभारली. मुशीर खान (136), श्रेयस अय्यर (95) आणि अजिंक्य रहाणे (73) यांनी मुंबईला या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

News Title- Mumbai captain Ajinkya Rahane shows his spirit while playing for Vidarbha in the final of Ranji Trophy 2023-24

महत्त्वाच्या बातम्या –

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 3 माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांना संधी!

‘कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी’; भाजपकडून फाटक्या साड्यांचं वाटप

बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

“फडणवीस यांच्या डोक्याला…”, मनोज जरांगेंचा गंभीर इशारा

मोठी बातमी! वसंत मोरे यांना ‘या’ पक्षातून थेट ऑफर