अर्जुन तेंडुलकरची घातक गोलंदाजी! भारी यॉर्कर अन् इशान चीतपट, Video

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Arjun Tendulkar | आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी सर्व संघांनी सराव सुरू केला आहे. या यादीत पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचाही समावेश आहे. मुंबई संघात माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचाही समावेश आहे. अर्जुन मागील बराच काळ मुंबईच्या संघाचा भाग आहे, पण त्याला गेल्या हंगामातून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. तो चार सामने खेळला. आता अर्जुन आगामी हंगामात चमकण्यासाठी आणि संघात संघात स्थान मिळवण्यासाठी सरावात सर्वोत्तम प्रयत्न करताना दिसत आहे. 22 मार्चपासून आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरूवात होत आहे.

नेटमध्ये त्याने इशान किशनला त्याच्या गोलंदाजीवर बाद केले. अर्जुन तेंडुलकर सातत्याने सराव करताना दिसला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाकडून खेळत त्याने अनेकदा प्रभावी कामगिरी केली. आता अर्जुन नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात दिसणार आहे. मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मास्टर ब्लास्टरचा मुलगा धारदार गोलंदाजी करताना दिसतो.

IPL 2024 ची चाहूल

अर्जुनला या मोसमात मुंबईसाठी जास्तीत जास्त सामने खेळायला नक्कीच आवडेल. यामुळे तो नेटमध्ये घाम गाळत आहे. अर्जुन नेट्समध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. मुंबईने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अर्जुनने इशान किशनला त्याच्या घातक यॉर्करने चीतपट केले.

अर्जुन तेंडुलकर रनअपवरून धावत येतो आणि नेटमध्ये फलंदाजी करत असलेल्या इशान किशनला यॉर्कर टाकतो. अर्जुनचा यॉर्कर पाहून इशानही अवाक् झाल्याचे दिसते. व्हिडीओमध्ये स्लो मोशनमध्ये इशान किशन कसा पडतो हेही दाखवण्यात आले आहे. त्यानंतर अर्जुन दुसरा यॉर्कर टाकतो आणि इशान तोही खेळू शकत नाही, असे दाखवण्यात आले आहे.

 

Arjun Tendulkar चा यॉर्कर

अर्जुनने आयपीएलच्या मागील हंगामातून या स्पर्धेत पदार्पण केले. पदार्पणाचा सामना त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध खेळला. अर्जुनने गेल्या मोसमात वानखेडेवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने या मोसमात एकूण चार सामने खेळले, ज्यात त्याने 3 बळी घेतले.

सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने अर्जुनच्या खेळीकडे अवघ्या जगाचे लक्ष असते. मीडिया देखील आवर्जुन त्याच्या खेळीवर फोकस करत असते. त्यामुळे दबावाच्या स्थितीत असलेल्या अर्जुनला अनेकदा रोहित शर्मा धीर देताना दिसला होता. अर्जुनने मागील आयपीएल हंगामात एका डावात फलंदाजी करताना 13 धावा केल्या होत्या.

News Title- Sachin Tendulkar’s son Arjun Tendulkar practicing in the nets before the start of IPL 2024 bowls a yorker to Ishan Kishan while bowling
महत्त्वाच्या बातम्या –

“आमच्यासोबत या निवडून आणतो”, ठाकरेंची ऑफर अन् गडकरींनी उडवली खिल्ली

धक्कादायक! मुंबईत व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

सिद्धू मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार; पण वडिलांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

रहाणे म्हणजे शिस्त…! शतकाची हुलकावणी पण अजिंक्यच्या कृतीनं जिंकलं मन, VIDEO

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 3 माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांना संधी!