…म्हणून भाजपला 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Uddhav Thackeray | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. सत्ताधारी भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर काँग्रेसने 43 उमेदवारांची दुसरी देखील यादी जाहीर केली आहे. अद्याप दोन्हीही पक्षांनी महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर जोरदार प्रहार करत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपवर गंभीर आरोप करत जोरदार निशाणा साधला.

संविधान बदलण्यासाठी भाजपला लोकसभेच्या 400 हून अधिक जागा जिंकायच्या आहेत, त्यानंतर देशात निवडणुका होणार नाहीत, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, लोकांनी आपल्यासमोर असलेल्या धोक्याची जाणीव ठेवली पाहिजे.

भाजपवर जोरदार निशाणा

ठाकरे म्हणाले की, आगामी निवडणुकीत भाजप लोकसभेच्या 400 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला जात आहे. पण, देशाच्या विकासासाठी त्यांना 400 पेक्षा जास्त जागा नको आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यांना देशाचे संविधान बदलायचे आहे. म्हणूनच त्यांना एवढ्या जागा जिंकायच्या आहेत, हे जनतेने ओळखायला हवे.

बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेत बदल करायचा आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. ज्या संविधानाच्या आधारे मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्या संविधानात ते बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांनी 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्यास राज्यघटना बदलण्याच्या योजनेबद्दल बोलले होते, याचाही उद्धव ठाकरेंनी दाखला दिला.

Uddhav Thackeray यांचे टीकास्त्र

तसेच जर एकदा संविधान बदलले तर ते सर्व अधिकार आपल्या हातात घेतील आणि देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचाही उद्धव ठाकरेंनी उल्लेख केला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप भाजपने महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराची घोषणा केली नाही.

उद्धव ठाकरे आणखी म्हणाले की, तुम्हा जनतेचे भवितव्य मोदींच्या हातात नाही, मोदींचे भवितव्य तुमच्या हातात आहे, हे ध्यानात ठेवा. यावेळी ‘अबकी बार बीजेपी 400 पार’ असा त्यांचा नारा आहे, पण मला आणखी एक नारा द्यायचा आहे तो म्हणजे ‘अबकी बार बीजेपी तडीपार’. पंतप्रधान मोदींची सर्व आश्वासने आणि गॅरंटी केवळ शब्द असल्याची टीकाही ठाकरेंनी केली.

News Title- Uddhav Thackeray has criticized that the ruling BJP will change the constitution if it wins 400 seats in Lok Sabha elections 2024
महत्त्वाच्या बातम्या –

अर्जुन तेंडुलकरची घातक गोलंदाजी! भारी यॉर्कर अन् इशान चीतपट, Video

“आमच्यासोबत या निवडून आणतो”, ठाकरेंची ऑफर अन् गडकरींनी उडवली खिल्ली

धक्कादायक! मुंबईत व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

सिद्धू मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार; पण वडिलांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

रहाणे म्हणजे शिस्त…! शतकाची हुलकावणी पण अजिंक्यच्या कृतीनं जिंकलं मन, VIDEO