‘निर्धार महाविजयाचा’; बारामतीत सुनेत्रा पवारांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

Supriya Sule Vs Sunetra pawar | बारामती लोकसभा मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. एकाच घरामध्ये आणि पक्षामध्ये उभी फूट पडल्याने बारामती लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra pawar) या आमनेसामने दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.

काही दिवसांआधी बारामतीतील काही कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा रथ फिरवला होता. तर त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या देखील नावाचा रथ फिरवला होता. यामुळे आता नणंद विरूद्ध भाऊजय असा मुकाबला होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यानंतर पुन्हा बारामतीमध्ये एका चौकामध्ये सुनेत्रा पवार यांची बॅनरबाजी केल्याने बारामतीकरांचं लक्ष लागलं आहे. (Supriya Sule Vs Sunetra pawar)

बारामतीच्या सिटी ईन चौकामध्ये भला मोठा फ्लेक्स लावला आहे. त्या फ्लेक्सने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. हा फ्लेक्स अजित पवार यांच्या एका कार्यकर्त्याने लावला आहे. त्याचं नाव हे सागर काटे असून या फ्लेक्सची जोरदार चर्चा आहे. (Supriya Sule Vs Sunetra pawar)

शरद पवार यांच्या बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या महाविजयाचा बॅनर, चर्चा तर रंगणार

सुनेत्रा पवार यांच्याकडून स्पष्ट संकेत

मंगळवारी सुनेत्रा पवार यांचा कार्यक्रम होता, त्यावेळी त्यांनी वक्तव्य केलं आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या संकेतामुळे सुनेत्रा पवार बारामतीतून लढणार असल्याचं निश्चित झालं असल्याच्यी चर्चा आहेत. त्या म्हणाल्या, मला दादा आणि तुमची साथ हवी आहे. मला तुमची साथ भेटली तर मी मोठं पाऊल टाकणार आहे, असे स्पष्ट संकेत सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. (Supriya Sule Vs Sunetra pawar)

बारामती येथील छत्रपती शिवाजीनगर महिला ग्रुपच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती.

शरद पवार बारामतीत तळ ठोकून

एका बाजूला सुनेत्रा पवार बारामतीमध्ये विविध कार्यक्रमाला जात मतदार आणि नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार हे आपली कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी जुन्या लोकांच्या संपर्कात आहेत. ते देखील ग्रामीण भाग पिंजून काढत आहेत.

News Title – Supriya Sule Vs Sunetra pawar Banner in Baramati

महत्त्वाच्या बातम्या

अर्जुन तेंडुलकरची घातक गोलंदाजी! भारी यॉर्कर अन् इशान चीतपट, Video

“आमच्यासोबत या निवडून आणतो”, ठाकरेंची ऑफर अन् गडकरींनी उडवली खिल्ली

धक्कादायक! मुंबईत व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

सिद्धू मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार; पण वडिलांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

रहाणे म्हणजे शिस्त…! शतकाची हुलकावणी पण अजिंक्यच्या कृतीनं जिंकलं मन, VIDEO