“शरद पवारांच्या सल्ल्यानेच भाजपमध्ये…”, एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तव्य

Eknath Khadse | उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांशी फारकत घेत भाजपसोबत सत्तेत सामील झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे आता दोन गट पडले आहेत. शरद पवार गटातील अनेक नेते आता अजित दादांसोबत जात आहेत. अशातच आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse ) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एकनाथ खडसे आता पुन्हा शरद पवार यांच्या गटातून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. एकेकाळी खडसे भाजपमध्येच होते. नंतर त्यांनी शरद पवारांचा हात धरला. आता खडसे यांनी स्वतःच भाजपत जाणार की नाही, याबाबत खुलासा केला आहे.

तसंच शरद पवार यांच्याबाबतीतही त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकारणात सध्या याचीच चर्चा होत आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपमधील घरवापसीच्या त्यांच्या सुरू असलेल्या चर्चेवर महत्वाचे वक्तव्य केले आहे.

एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तव्य

“माझ्यामागे इडी लावली गेली. तसंच पोलीस केसेसच्यावेळी मी भाजपत गेलो नाही, मग आता कशाला जाऊ?, मला तिथं जाण्याची गरज  नाही. जायचंच असेल तर लपून छपून नाही तर शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच उघडपणे जाईन”, असं एकनाथ खडसे (Eknath Khadse ) यांनी म्हटलं.

तसंच खासदार रक्षा खडसे राष्ट्रवादीत येणार नाही. दहा वर्ष त्या भाजपच्या खासदार राहिल्या आहेत, त्यामुळे पक्ष सोडण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी गिरीश महाजन व अनिल पाटील यांच्यावरही निशाणा साधला. ते फक्त चार महिन्यांचे आमदार आहेत, पण मी चार वर्ष आमदार राहणार असल्याचं खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार?

वाईट काळात मला शरद पवारांनी सहा वर्षासाठी आमदार केले. त्यांना सोडून मी जाऊ शकत नाही. भाजप पक्ष श्रेष्ठींनी रक्षा खडसे यांच्या मार्फत भाजपमध्ये येण्याचा निरोप दिल्याच्या प्रश्नावर रक्षा मला सल्ला देतील अजून त्या इतक्या मोठ्या झालेल्या नाहीत, असं स्पष्टपणे एकनाथ खडसे म्हणाले.

आजपर्यंत पवार साहेबांच्या सल्ल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट केलेली नाही. त्यामुळे मला भाजपमध्येही जायचं असेल तर मी त्यांना सांगून त्यांच्या परवानगीनेच जाईल, असं स्पष्टीकरण यावेळी खडसे (Eknath Khadse ) यांनी दिलं आहे. त्यामुळे राजकारणात आता खडसे यांची चर्चा होत आहे.

News Title : Eknath Khadse Big statement

महत्त्वाच्या बातम्या –

अर्जुन तेंडुलकरची घातक गोलंदाजी! भारी यॉर्कर अन् इशान चीतपट, Video

“आमच्यासोबत या निवडून आणतो”, ठाकरेंची ऑफर अन् गडकरींनी उडवली खिल्ली

धक्कादायक! मुंबईत व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

सिद्धू मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार; पण वडिलांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

रहाणे म्हणजे शिस्त…! शतकाची हुलकावणी पण अजिंक्यच्या कृतीनं जिंकलं मन, VIDEO