‘संसदेत वाघ पाठवायचा की नंदीबैल?’, अमोल कोल्हे आणि आढळराव आमनेसामने

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amol Kolhe Vs Adhalrao Patil | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. आजी आणि माजी खासदार आपापल्या मतदारसंघामध्ये जात मतदारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता शिरूर मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. विद्यामान खासदार अमोल कोल्हेंना आणि माजी खासदार आढळराव पाटील (Amol Kolhe Vs Adhalrao Patil) यांनी नंदीबैल आणि पोपट अशी उपमा देत एकमेकांवर हल्ला केला आहे.

अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये वाघ पाठवायचा की नंदीबैल अशी टीका आढळराव पाटील यांच्यावर केली आहे. त्यावर आढळराव पाटील म्हणाले की, संसदेत पोपट नाहीतर विकास कामं केलेला नेता पाठवायचा आहे, असा पलटवार आढळराव पाटील यांनी केला. त्यावर पुन्हा एकदा अमोल कोल्हे बरसले आहेत. (Amol Kolhe Vs Adhalrao Patil)

लोकसभा निवडणुकीआधीच शिरूर मतदारसंघामध्ये पोपट आणि नंदीबैल म्हणत एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. आढळराव पाटील यांनी केलेल्या हल्ल्यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. (Amol Kolhe Vs Adhalrao Patil) सामान्य माणसांचे प्रश्न संसदेमध्ये वाचारत असेल तर त्याला पोपटगिरी म्हणत असाल तर हा जनतेचा अवमान आहे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर टीका केली. (Amol Kolhe Vs Adhalrao Patil)

तुम्ही पोपटगिरी म्हणता?

शेतकऱ्यांचे जनतेचे प्रश्न, जनतेच्या वेदना पोटतिडकीने मांडण्यात आल्या असून त्याला तुम्ही पोपटगिरी म्हणत असाल तर हा जनतेचा आवमान आहे. दुधाचे पडलेले भाव, शेतकऱ्यांच्या मालाचे बाजारभाव यावरून महायुतीचे खासदार गप्प आहेत, असा हल्ला अमोल कोल्हे यांनी केला आहे.

“विकासकामे करणे हे नटाचे काम नाही”

आढळराव पाटील यांनी विकासकामे करणे हे नटाचे काम नाही. अमोल कोल्हे यांनी एक रूपयाचं काम केलं नाही. गावभेट दिली नाही. केवळ चांगली भाषणे केली म्हणजे मतदारसंघातील प्रश्न सुटतील असं नाही, असा हल्लाबोल आढळराव पाटील यांनी केला आहे.

गल्लित फिरणारा म्हणून ते माझी खिल्ली उडवतात. ते खरं आहे पण राजकारण हे गल्लीतून सुरू होतं, असं म्हणत आढळराव यांनी अमोल कोल्हे यांच्यावर हल्ला चढवला आहे.

News Title- Amol Kolhe Vs Adhalrao Patil Shirur loksabha Election

महत्त्वाच्या बातम्या

…म्हणून भाजपला 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

अर्जुन तेंडुलकरची घातक गोलंदाजी! भारी यॉर्कर अन् इशान चीतपट, Video

“आमच्यासोबत या निवडून आणतो”, ठाकरेंची ऑफर अन् गडकरींनी उडवली खिल्ली

धक्कादायक! मुंबईत व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

सिद्धू मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार; पण वडिलांनी व्यक्त केली ‘ही’ भीती