“देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार बारामती हरणार”, महायुतीच्याच नेत्याचं भाकीत

Ajit Pawar Vs Vijay Shivtare | बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता मोठा ट्विस्ट निर्माण होणार आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघामधून लढणार असल्याच्या चर्चा आहेत. अशातच आता शिवसेनेचे पुरंदर तालुक्याचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवार (Ajit Pawar Vs Vijay Shivtare) यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला बोल केला आहे. “देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार बारामती हरणार”, असं भाकीत त्यांनी केलं असल्यानं आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मोठा ट्वीस्ट निर्माण होणार आहे.

अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात राजकीय वैर

अजित पवार आणि विजय शिवतारे (Ajit Pawar Vs Vijay Shivtare) यांच्यात अनेक वर्षांपासून वाद असल्याची चर्चा आहे. याचपार्श्वभूमीवर विजय शिवतारे यांनी मी बारामती लोकसभा निवडणूक लढणार म्हणजे लढणार असल्याचा निर्धार केला आहे. यामुळे शिवतारे यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. यामुळे आता अजित दादा आणि शिवतारे (Ajit Pawar Vs Vijay Shivtare) यांच्यात राजकीय वैर कमी होण्याऐवजी वाढू लागलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही, असं विजय़ शिवतारे म्हणालेत, या वक्तव्यावर अजित पवार काहीतरी प्रतिक्रिया देतील अशी चर्चा होती, मात्र तसं झालं नाही. 2019 मध्ये ही मी पार्थ पवार यांच्याविरोधात प्रचार केला होता. तो राजकीय भाग म्हणून केला होता. मात्र वैयक्तिक हितासाठी मी कोणताही प्रचार केला नाही, असं शिवतारे म्हणाले आहेत. (Ajit Pawar Vs Vijay Shivtare)

त्यानंतर त्यांनी अजित पवार हे उर्मट आहेत. याला पाडा…त्याला पाडा…हे बरं नाही असं म्हणत शिवतारे यांनी अजित पवार यांना धारेवर धरलं आहे. त्यानंतर 23 दिवस लिलावती रूग्णालयामध्ये उपचार घेत असताना रूग्णवाहिकेतून विजय शिवतारे यांनी प्रचार केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी पालखी तळावरून माझ्यावर गंभीर आरोप केला. मरायला लागला तर कशाला प्रचार करताय? सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं बोलत आहात, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी शिवतारे यांच्यावर केलेला.

“अजित पवार उर्मट आहेत”

अजित पवार हे उर्मट आहेत. महायुतीत आल्यानंतर मी त्यांना माफ केलं. मी त्यांच्या भेटीला देखील गेलो होतो, पण अजितदादा यांची गुर्मी तशीच आहे. त्यामुळे दौंडची लोकं देखील अजित पवार हे उर्मट असून आम्ही सुप्रिया सुळे यांना मत देणार आहेत, असं शिवतारे यांनी सांगितलं आहे.

आम्ही पुण्याचे मालक

पवार विरूद्ध बारामतीतील सर्वसामान्य लोकं अशी लढाई असणार आहे. सर्वांना पवारांनी त्रास दिला आहे. भोरचे अनंतराव थोपटे हे 1999 मध्ये मुख्यमंत्री झाले असते. संग्राम थोपटे यांना मंत्रीपद आणि विधानसभा अध्यक्षपद मिळालं असतं पण अजित पवार यांनी दिलं नाही. आम्ही पुण्याचे मालक अशी अजित पवार यांची मानसिकता आहे, असं म्हणत विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

News Title – Ajit Pawar Vs Vijay Shivtare News Update

महत्त्वाच्या बातम्या

हरियाणात नाट्यमय घडामोडी; मोठी अपडेट समोर

अभिनेत्री करिश्मा कपूरचा सर्वांत मोठा खुलासा, म्हणाली…

“…तर मी शरद पवारांनाही सोडणार नाही”, मनोज जरांगेंचं खळबळजनक वक्तव्य

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी सर्वांत मोठी अपडेट समोर!

“स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी…”, रोहित पवारांचा अजित पवारांना टोला