हरियाणात नाट्यमय घडामोडी; मोठी अपडेट समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manohar Lal Khattar | हरियाणामध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, हरियाणातील भाजपा-जननायक जनता पक्ष (जेजेपी) यांचीही आघाडी तुटली आहे.

आता खट्टर यांच्या जागी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने कुरुक्षेत्राचे खासदार नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्री बनवले आहे. त्यामुळे हरियाणाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय याबाबत आता चर्चा होत आहे. एक दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खट्टर यांचे कौतुक केले होते.

नायब सिंह सैनी नवे मुख्यमंत्री

याच्या दुसऱ्याच दिवशी मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खट्टर आणि मी खूप वर्षांपासून मित्र असल्याचे म्हणत मोदी यांनी एक किस्सा देखील सांगितला होता.

मी खट्टर (Manohar Lal Khattar) यांच्या मोटारसायकलवरून फिरायचो. अनेकदा रोहतक ते गुरुग्राम असा प्रवास आम्ही मोटारसायकलवरून करायचो. तेव्हा रस्ते छोटे होते, पण आज संपूर्ण गुरुग्राम प्रदेश अनेक प्रमुख राष्ट्रीय महामार्गांशी जोडला गेला आहे. यामध्ये एक्सप्रेस वेचादेखील समावेश आहे. या प्रगतीतून मुख्यमंत्र्यांची दूरदृष्टी दिसते. आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हरियाणातील प्रत्येक नागरिकाचे भविष्य सुरक्षित आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

खट्टर यांना हटवण्याचे कारण काय?

राजकारणात आता खट्टर (Manohar Lal Khattar) यांना हटवण्याचे कारण काय, याबाबत चर्चा होत आहे. खट्टर हे दोनवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. दोन टर्मनंतर मुख्यमंत्री बदलण्याची पक्षाची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच त्यांचा राजीनामा घेतल्याचे आता म्हटले जात आहे.

भाजपला यंदा लोकसभा निवडणुकीत सर्व 10 जागा जिंकण्याचा विश्वास आहे. मात्र, विधानसभा निवडणूक पक्षासाठी चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं जात आहे. कारण, शेतकरी आंदोलन आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी अडचण ठरू शकतो.

News Title : Manohar Lal Khattar resignation as Chief Minister

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून भाजपला 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

अर्जुन तेंडुलकरची घातक गोलंदाजी! भारी यॉर्कर अन् इशान चीतपट, Video

“आमच्यासोबत या निवडून आणतो”, ठाकरेंची ऑफर अन् गडकरींनी उडवली खिल्ली

धक्कादायक! मुंबईत व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

सिद्धू मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार; पण वडिलांनी व्यक्त केली ‘ही’ भीती