शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad pawar | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. विरोधक सत्ताधारी पक्षांवर तर सत्ताधारी विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पडल्याने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे आमनेसामने लढणार आहे. अशातच आता भाजपचे खासदार शरद पवार (Sharad pawar) गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला बळ मिळू लागलं आहे.

शरद पवार यांच्याकडे भाजपचा नेता करणार कमबॅक?

भाजपने (Sharad pawar) शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला असल्याचं बोललं जातं. यापार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad pawar) यांनी भाजपला लक्ष केलं आहे. भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे गेल्या काही वर्षांपासून भाजपपासून दूर आहेत. यामुळे हरिश्चंद्र चव्हाण हे शरद पवार यांच्याकडे येणार असल्याची चर्चा आहे. यामुळे भाजपच्या दिंडोरी मतदारसंघाला फटका बसण्याची शक्यता आहे.

हरिश्चंद्र चव्हाण शरद पवार गटात येणार?

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी काढून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण पक्षावर नाराज होते. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad pawar) पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

नाशिक मतदारसंघामध्ये शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढवणार असल्याची इच्छा दर्शवली आहे. ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नाशिकमधून विद्यामान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे तिकीट जरी मिळालं नाही तरीही आपण अपक्ष निवडणूक लढणार असल्याची इच्छा दर्शवली जात आहे.

श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेनंतर शांतिगिर महाराज नाराज झाले आहेत. ते महाविकास आघाडीसोबत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र तसं काही नाही, अशी माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहिर केली आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ते ऑथॉरिटी नाही असं वक्तव्य केलं आहे.

News Title – Sharad pawar Ncp Return BJP leader

महत्त्वाच्या बातम्या 

“शरद पवारांच्या सल्ल्यानेच भाजपमध्ये…”, एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तव्य

‘एका तासाची सोय होईल?’, अभिनेत्री वनिता खरातचा अत्यंत धक्कादायक खुलासा

…म्हणून भाजपला 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

अर्जुन तेंडुलकरची घातक गोलंदाजी! भारी यॉर्कर अन् इशान चीतपट, Video

“आमच्यासोबत या निवडून आणतो”, ठाकरेंची ऑफर अन् गडकरींनी उडवली खिल्ली