भाजपचं धक्कातंत्र; ‘या’ 5 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

BJP candidate list | भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीत (BJP candidate list) भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

‘या’ 5 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं

भाजपने निवडणुकीच्या तिकीट वाटपात दिग्गजांचा पत्ता कट करत धक्कातंत्राचा वापर केला आहे. भाजपने महाराष्ट्रात 5 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं आहे. भाजपने बीड, जळगाव, मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर पूर्वमधून उमेदवार बदलले आहेत. बीडमधून प्रीतम मुंडेंचं, जळगावमधून उन्मेश पाटील यांचं, मुंबई उत्तर पूर्वमधून मनोज कोटक यांचं तर मुंबई उत्तरमधून गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापण्यात आलं आहे.

दिग्गजांचा पत्ता कट

चंद्रपूरमधूनही भाजपने उमेदवार बदलला आहे. 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांचा काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी पराभव केला होता. आता चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आलं आहे.

जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना संधी देण्यात आली आहे. रक्षा खडसे यांच्या उमदेवारीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. रक्षा खडसे या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत.

भाजपने महाराष्ट्रातील दिग्गजांची नावं जाहीर केली असली तरी अनेक दिग्गजांनी नावं कापली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचं नाव आहे. गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल (Piyush Goyal) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; ‘या’ दिग्गजांना संधी

मंत्रालयातून मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी बदलली!

‘या’ गोष्टींसाठी पतीला कधीच नाही म्हणू नका, अन्यथा…

बारामतीच्या आखाड्यात बच्चू कडूंची एन्ट्री, अजित पवार-सुप्रिया सुळेंना धक्का!

“देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार बारामती हरणार”, महायुतीच्याच नेत्याचं भाकीत