मंत्रालयातून मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी बदलली!

Eknath Shinde Name | मंत्रालयातून एक सर्वात मोठी माहिती आता समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Name) यांच्या मंत्रालयातील नावाची पाटी बदलण्यात आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde Name) यांचं मंत्रालयामध्ये दालन आहे. त्या दालनाबाहेर नवीन करकरीत नावाची पाटी लावण्यात आली आहे. ही पाटी पाहण्यासाठी मंत्रालयातील अनेक कर्मचारी शिंदेंच्या दालनाबाहेर येत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Name) याचं मंत्रालयामध्ये सहाव्या माळ्यावर दालन आहे. त्याठिकाणी त्याच्या दालनाबाहेर त्यांच्या नावाची नवीन पाटी लावण्यात आली आहे. शासनाने त्या पाटीवर पूर्ण नावामध्ये त्यांच्या आईच्या नावाचा देखील समावेश करणं बंधनकारक असणार आहे असं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांनी देखील या निर्णयाची अंमलबजावणी करत पाटी लावून घेतली आहे. त्या पाटीवर “एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे” असं लिहिलं आहे. (Eknath Shinde Name)

eknath shinde new name plate

आदिती तटकरे यांचा प्रस्ताव

महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सरकारी दस्तऐवजावर आपल्या वडिलांसोबत आईचं देखील नाव लावता येणार असल्याचं सांगितलं आहे. हा ऐतिहासिक निर्णय काही महिन्यांआधी घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: पासून केली आहे.

मुलाला जन्म देण्यापासून त्याचं पालपोषन करणं. यामध्ये वडिलांप्रमाणे आईचा देखील वाटा आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दालनाबाहेर आपल्या आईच्या नावाचा देखील समावेश केला आहे. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे असं संपूर्ण नावाची पाटी दालनाबाहेर लावण्यात आली आहे.

वडिलांप्रमाणे आईचे महत्त्व अधोरेखित व्हावं

समाजात वडिलांप्रमाणे आईचे संगोपन करण्यात, तसेच जन्म देण्यापासून स्वत:च्या पायावर मोठं करण्यास, त्यांचे पालपोषण करणे, ते श्रेय वडिलांप्रमाणे आईला मिळावे यासाठी आईचे महत्त्व अधोरेखित व्हावं वडिलांसोबत आईचंही नाव आता लावणं बंधनकारक करण्यात आलं. त्याची सुरूवात मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील दालनाबाहेर देखील नावाच्या पाट्या बदलण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘अजित आशाताई अनंतराव पवार’, तर ‘देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस’ अशी नावाची पाटी लावण्यात आली आहे.

News Title – Eknath Shinde name plate Change

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पुण्यातील ‘या’ तालुक्याचं नाव बदललं

‘या’ बड्या अभिनेत्यांचा CAA ला कडाडून विरोध; भाजपला चांगलंच झापलं

यश मिळवायचं असेल तर ‘या’ 3 गोष्टी नक्की करा

शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत!

हरियाणात नाट्यमय घडामोडी; मोठी अपडेट समोर