CAA | मोदी सरकारने सोमवारी (11 मार्च) CAA कायद्याच्या अंमलबजावणीची घोषणा केली. या अंतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळणं सोप्प होणार आहे.
अनेकांनी या निर्णयाचे स्वागत देखील केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, बरेच जण याला विरोध देखील करत आहे. यात आता साऊथच्या दोन सुपरस्टारचा देखील समावेश आहे.
साऊथ स्टार कमल हसन आणि विजय थलापति यांनी या कायद्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. या कायद्याला विरोधी पक्ष देखील विरोध करत आहेत. कमल हसन यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) पोस्ट करत याला विरोध दर्शवीत ‘भारतासाठी काळा दिवस’ असं म्हटलं आहे.
कमल हसन यांचा ‘CAA’ ला विरोध
अभिनेते कमल हसन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, “भारतासाठी काळा दिवस. धर्मावर आधारित नागरिकत्व चाचणी (CAA) प्रजासत्ताकाच्या धर्मनिरपेक्ष घटनात्मक पायाच्या विरोधात आहे आणि मी माझ्या सर्व शक्तीनिशी कायदेशीर आणि राजकीय दृष्ट्या त्याविरुद्ध लढा देईन”, असं आव्हानच कमल हसन यांनी दिलं आहे.
Dark day for India.
A religion-based citizenship test is antithetical to the secular constitutional foundations of the republic, and I will fight against this legally and politically with all my might.#CAA #MNMagainstCAA #CAANotification https://t.co/lNMxhdkFQT
— Kamal Haasan (@ikamalhaasan) March 12, 2024
थलापथी विजयची राज्य सरकारकडे मोठी मागणी
साऊथ स्टार थलापथी विजय यानेही या विधेयकावर (CAA) प्रतिक्रिया दिली आहे. विजयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर म्हटलं की, “ज्या वातावरणात देशातील सर्व नागरिक सामाजिक सलोख्याने जगत आहेत, तेथे भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) सारखा कोणताही कायदा लागू करणे मान्य नाही.”
यासोबतच थालपथी विजय याने राज्य सरकारला तामिळनाडूमध्ये या विधेयकाची अंमलबजावणी करू नये, असे आवाहन देखील केलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक कमेंट्सचा केल्या जात आहेत. विजय चित्रपटांसोबतच राजकारणात देखील सक्रिय आहे. त्यामुळे विजयच्या या पोस्टची आता चर्चा होत आहे.
News Title : Kamal Haasan and Thalapathy Vijay oppose CAA
महत्त्वाच्या बातम्या –
अर्जुन तेंडुलकरची घातक गोलंदाजी! भारी यॉर्कर अन् इशान चीतपट, Video
“आमच्यासोबत या निवडून आणतो”, ठाकरेंची ऑफर अन् गडकरींनी उडवली खिल्ली
धक्कादायक! मुंबईत व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
सिद्धू मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार; पण वडिलांनी व्यक्त केली ‘ही’ भीती
रहाणे म्हणजे शिस्त…! शतकाची हुलकावणी पण अजिंक्यच्या कृतीनं जिंकलं मन, VIDEO