भाजपने मुलाला आधीच दिला होता आदेश, आता बापाचा पत्ता केला कट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Akola loksabha Election | राज्याच्या राजकारणामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीआधी मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. बीडसारख्या मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांना बाजूला सारत पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून संधी दिली आहे. नुकतीच काही वेळाआधी भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपकडून धक्कातंत्र सत्र सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. (Akola loksabha Election)

भाजपने एक दोन नाही तर तब्बल 4 खासदारांचं तिकीट कापलं आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, बीडच्या पंकजा मुंडे, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार मनोज कोटक, जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापण्यात आलं आहे.

गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियूष गोयल यांना संधी दिली आहे. उन्मेश जाधव यांच्या जागी स्मिता वाघ, मनोज कोटकऐवजी मिहिर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे. तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे.

अकोल्यात बापाचं तिकीट कापत मुलाला संधी

भाजपने अकोल्यामध्ये (Akola loksabha Election) मोठी राजकीय खेळी खेळली आहे. भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केला असल्याचं दिसत आहे. कारण अकोल्याचे 20 वर्षांपासून निवडून येणारे खासदार संजय धोत्रे यांचं तिकीट कापलं आहे. भाजपने धोत्रे कुटुंबामध्ये लोकसभेचं तिकीट दिलं आहे. संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने अकोला लोकसभेची (Akola loksabha Election) उमेदवारी दिली आहे.

अनुप यांची पहिली प्रतिक्रिया

अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की मला उमेदवारीची अपेक्षा नव्हती. पण पक्षाने गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघामध्ये मतदारांच्या संपर्कात राहण्यास सांगितलं होतं तो आदेश मी पार पाडला आहे, असं अनुप म्हणाले.

अनुप यांचं सिंबायोसिस विद्यालयामध्ये शिक्षण झालं आहे. त्यांचा अकोला औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग समूह आहे. अनुप इंजिनीअरिंग वर्क्स, सोनल इंजिनीअरिंग वर्क्स, थर्मल पॉवर प्लांटसाठी जॉबवर्क, अन्न प्रक्रिया युनिट, शहरी भू- विकास यांचा समावेश आहे. त्यांचे पक्षातील कार्यकर्त्यांसोबत चांगले संबंध आहेत.

News Title- Akola loksabha Election Candidate

महत्त्वाच्या बातम्या- 

Pune News: पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळताच मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया

Pune Lok sabha: पुण्यात जगदीश मुळीक यांचा हिरमोड, आता काय निर्णय घेणार?

भाजपकडून सुजय विखेंची उमेदवारी जाहीर, दुसरीकडे शरद पवारांचा मोठा डाव?

भाजपच्या यादीत पाच महिला, मात्र नवनीत राणांचं टेन्शन वाढलं!

बीडमधून मुंडे कुटुंबाला धक्का, भाजपने घेतला मोठा निर्णय