बीडमधून मुंडे कुटुंबाला धक्का, भाजपने घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pankaja Munde | भाजपने लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यामध्ये 20 भाजप नेत्यांचा समावेश आहे. त्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे याचं नाव आहे. अर्थातच पक्षानं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची बहिण प्रीतम मुंडे यांना बाजूला सारत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षाने लोकसभेची संधी दिली आहे.

अनेक महिन्यांपासून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपने संधी दिली नव्हती अशा चर्चा होत्या. भाजपने पंकजा मुंडे यांना डावललं का? असा देखील प्रश्न उपस्थित होत होता. राष्ट्रवादी काँग्रेस फूटीआधी म्हणजेच 2019 मध्ये पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याविरोधात विजय मिळवला होता.

पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात

धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यानंतर पंकजा मुंडे यांना भाजपने संधी दिली नाही अशा चर्चा होत्या. पंकजा मुंडे यांना भाजपपासून दूर केलं जात आहे. मात्र आता पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

मी माझ्या बहीणीच्या जागेवर उभी राहणार नसल्याचं पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र आता भाजप पक्षाने आदेश दिल्यानं त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे.

महाशिवरात्री निमित्ताने पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी सिद्धनाथ संस्थानावर महाशिवरात्रीनिमित्त उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी त्याठिकाणी काही स्थानिक नेते होते. त्यावेळी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केलं होतं. यंदाच्या लोकसभेमध्ये माजी काळजी तुम्ही घ्या आणि तुमची काळजी मी घेते, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं, यामुळे पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

पंकजा मुंडे यांच्याविरोधात बीडमधून महाविकास आघाडी कोणता पर्याय निवडणार हे पाहणं गरजेचं असणार आहे. तो उमेदवार शरद पवारांचा असेल उद्धव ठाकरे यांचा असेल की काँग्रेसचा असेल? हे लवकरच स्पष्ट होईल.

News Title- Pankaja Munde Get Chance About Beed Assembly Election

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकर होरपळले, ‘या’ भागात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद!

पुण्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपला, ‘या’ नेत्याला दिलं लोकसभेचं तिकीट

भाजपचं धक्कातंत्र; ‘या’ 5 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं

सर्वात मोठी बातमी! भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; ‘या’ दिग्गजांना संधी

मंत्रालयातून मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी बदलली!