पिंपरीतील येवले चहाच्या दुकानात घडला धक्कादायक प्रकार, मालकावर गुन्हा दाखल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पिंपरी येथे येवले चहाच्या दुकानामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाला वीजेचा झटका लागल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीतील येवले चहाच्या दुकानामध्ये घडला आहे. मालक गणेश जगताप यांच्यावर अल्पवयीन कामगाराच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे येवले चहाचे मालक आता अडचणीत आले आहेत. (Pune News)

येवले चहाच्या दुकानात घडला धक्कादायक प्रकार

येवले चहाच्या दुकानावर 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा काम करत होता. त्यावेळी त्याला काम करत असताना वीजेचा झटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना तळवडेतील टॉवर लाईन येथील असून सोमवारी (दि. 11) दिवशी दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे. प्रेमकुमार बनसोडे राहणार मिलिंदनगर वय (43) यांनी दुकान मालकावर चिखली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. (Pune News)

मुलाचे वय हे 17 वर्षे आहे असं माहित असूनही कामावर ठेवलं होतं. दुकानामध्ये असणाऱ्या फ्रिझमधून करंट वाहत होता. याबाबत अनेकदा गणेशला सांगण्यात आलं पण त्यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. गणेश जगतापने यावर दुर्लक्ष केलं, असं फिर्यादीमध्ये प्रेम कुमार यांनी नमूद केलं होतं. (Pune News)

अल्पवयीन मुलाचा मृत्यू

फ्रिजमधून करंट वाहत आहे. तरीही कामगाराच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली नाही. मुलाला चहाचे कप काढण्यासाठी फ्रिजवर चढवले. त्यावेळी वीजेचा करंट वाहत होता. त्यामुळे वीजेच्या धक्क्याने कामगार मुलाला वीजेचा झटका लागला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. (Pune News)

अल्पवयीन मुलाला कामावर ठेवले. अल्पवयीन मुलाला बेकादेशीर कामावर ठेऊन कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही. त्यामुळे गणेश जगतापवर बालकामगार सुधारीत अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस निरिक्षक गणेश खरगे यांनी दिली आहे.

येवले चहाच्या दुकानामध्ये काम करत असताना फ्रिजमधून वाहत असलेला करंट त्याची उपाययोजना करणं गरजेचं होतं. याआधी अनेकदा कामगाराने गणेश जगतापला फ्रिजमध्ये वाहत असलेल्या करंटबाबत उपाययोजना करण्यासाठी सांगितलं होतं. पण ते शेवटी बालकामगाराच्या जिवाशी बेतलं आहे.

News Title – Pune News Pimpri in Child labor Dies due to Electricity in Yewale tea Shop

महत्त्वाच्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; ‘या’ दिग्गजांना संधी

मंत्रालयातून मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी बदलली!

‘या’ गोष्टींसाठी पतीला कधीच नाही म्हणू नका, अन्यथा…

बारामतीच्या आखाड्यात बच्चू कडूंची एन्ट्री, अजित पवार-सुप्रिया सुळेंना धक्का!

“देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार बारामती हरणार”, महायुतीच्याच नेत्याचं भाकीत