Pune Lok sabha: पुण्यात जगदीश मुळीक यांचा हिरमोड, आता काय निर्णय घेणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune Lok sabha | लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने बुधवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करून महाराष्ट्रातील महायुतीच्या 20 उमेदवारांची नावं उघड केली आहेत. (Lok Sabha Election 2024) भाजपने धक्कातंत्र कायम ठेवत काही विद्यमान खासदारांची तिकीटं कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली, तर काही ठिकाणी मंत्री लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. पुण्यात मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे.

पुण्याचे माजी महापौर, भाजपचे सरचिटणीस अशी ओळख असलेल्या मोहोळ यांना लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. मुरलीधर मोहोळ यांना तिकीट मिळाल्यामुळे पुण्याच्या राजकारणात ट्विस्ट आला असल्याचे दिसते. पुण्यातून लोकसभेसाठी मोहोळ यांच्याबरोबर जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचं देखील नाव फार चर्चेत होतं. पण, त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते नेमका काय निर्णय घेतात हे पाहण्याजोगं असेल.

जगदीश मुळीक यांचा हिरमोड

मुळीक यांच्या भूमिकेकडं राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वीच जगदीश मुळीक यांनी राज्यातील भाजपचे बडे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी भेट घेतली असल्याचे सांगण्यात आले. पण, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. खरं तर पुणे लोकसभेसाठी सुरुवातीपासून मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक हे प्रबळ दावेदार मानले जात होते.

मोहोळ यांना तिकीट देण्याची चर्चा रंगताच आणि त्यावर शिक्कामोर्तब होईल असे वाटत असताना मुळीक यांनी फडणवीसांची भेट घेतली असल्याचं सांगितलं गेलं. राज्यातील अशा अनेक जागा आहेत, जिथे एका जागेसाठी दोन किंवा त्याहून अधिक उमेदवार इच्छुक आहेत. पुणे लोकसभेवरून स्थानिक भाजपमध्ये अंतर्गत वाद असल्याची चर्चा रंगली होती. मोहोळ आणि मुळीक यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती.

Pune Lok sabha । मोहोळ यांना तिकीट

मात्र, बुधवारी या चर्चेला पूर्णविराम मिळाला आणि मोहोळ यांना लोकसभेसाठी तिकीट जाहीर झालं. अंतर्गत वाद पाहता मुळीक यांनी सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस आणि जगदीश मुळीक यांच्यामध्ये चर्चा झाली. लोकसभेच्या उमेदवारीवरून पुण्यात बॅनरबाजी पाहायला मिळाली होती. मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक समर्थकांनी भावी खासदार अशा आशयाचे बॅनर लावून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला.

बॅनरबाजी यावरूनच वाद सुरू झाला असल्याचं बोललं जात होतं. परंतु, आता भाजप नेतृत्वानं देखील मोहोळ यांच्या नावावरून शिक्कामोर्तब केला असून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात जगदीश मुळीक कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title- Muralidhar Mohol has been nominated by BJP for Pune Lok Sabha and Jagdish mulik has not got ticket
महत्त्वाच्या बातम्या –

भाजपच्या यादीत पाच महिला, मात्र नवनीत राणांचं टेन्शन वाढलं!

बीडमधून मुंडे कुटुंबाला धक्का, भाजपने घेतला मोठा निर्णय

पिंपरीतील येवले चहाच्या दुकानात घडला धक्कादायक प्रकार, मालकावर गुन्हा दाखल

पुणेकर होरपळले, ‘या’ भागात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद!

पुण्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपला, ‘या’ नेत्याला दिलं लोकसभेचं तिकीट