भाजपकडून सुजय विखेंची उमेदवारी जाहीर, दुसरीकडे शरद पवारांचा मोठा डाव?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nilesh Lanke | लोकसभा निवडणुकीसाठी बुधवारी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची घोषणा केली. भाजपने अहमदनगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा सुजय-विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या सुजय विखे यांच्यावर दुसऱ्यांदा पक्षाने विश्वास दाखवला आहे. पण, त्यांना उमेदवारी जाहीर होताच शरद पवार यांनी एक मोठा डाव टाकला. विखेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटातील आमदार निलेश लंके यांच्या पक्षांतराची चर्चा रंगली आहे.

माहितीनुसार, आमदार लंके हे गुरूवारी म्हणजेच भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीतील उमेदवार म्हणून समोर येतील. अर्थात लंके आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार असल्याचे कळते. मागील दोन दिवसापांसून लंके अजित दादांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे.

शरद पवारांचा मोठा डाव?

मात्र, निलेश लंकेंबाबत बोलताना शरद पवारांनी सावध भूमिका घेतली. ते म्हणाले होते की, आमदार लंके कुठे जाणार याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. त्यामुळे लंकेच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला तूर्त पूर्णविराम मिळाला होता. पण आज लंके खरोखर शरद पवारांच्या पक्षात जाणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आज पुण्यात शरद पवारांच्या निवासस्थानी सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी निलेश लंके आपली भूमिका स्पष्ट करतील. ते अहमदनगर दक्षिणमधून लोकसभेसाठी सुजय विखेंविरोधात उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. 2019 च्या निवडणुकीत या जागेवर सुजय विखे यांनी मोठा विजय मिळवत खासदार होण्याचा मान पटकावला. त्यामुळे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे जाणारे लंके पहिले आमदार ठरतात का हे पाहण्याजोगे असेल.

Nilesh Lanke पक्ष बदलणार?

अलीकडेच निलेश लंकेचा वाढदिवस झाला. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बॅनरबाजी न करण्याचे आवाहन केले होते. यावेळी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी उघडपणे निलेश लंके यांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. लंकेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी लंकेंना सांगितले की, आमच्या पक्षात या आणि दक्षिण नगरमध्ये स्वाभिमानाची तुतारी वाजवा. अमोल कोल्हे यांनी आवाहन केल्यानंतर पुण्यातील शासकीय विश्रामगृहात निलेश लंके आणि कोल्हे यांच्यात भेट झाली होती. बंद दाराआड झालेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

News Title- MLA Nilesh Lanka is likely to join Sharad Pawar’s party after BJP nominated Sujay Vikhe Patil for Ahmednagar South Lok Sabha seat

महत्त्वाच्या बातम्या –

भाजपच्या यादीत पाच महिला, मात्र नवनीत राणांचं टेन्शन वाढलं!

बीडमधून मुंडे कुटुंबाला धक्का, भाजपने घेतला मोठा निर्णय

पिंपरीतील येवले चहाच्या दुकानात घडला धक्कादायक प्रकार, मालकावर गुन्हा दाखल

पुणेकर होरपळले, ‘या’ भागात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद!

पुण्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपला, ‘या’ नेत्याला दिलं लोकसभेचं तिकीट