लग्नापूर्वी मुलींनी ‘या’ 5 गोष्टी शिकायलाच हव्या!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. चाणक्य यांना भारतीय राजकीय विचारवंत, राजकीय तत्वज्ञानी, राजकीय धोरण निर्माता, शिक्षक, सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लागार (Chanakya Niti) म्हणूनही ओळखले जाते.

चाणक्य यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर काही न काही तत्वज्ञान सांगितले आहे. जीवनात येणाऱ्या अडचणी असो किंवा जीवनात मनुष्याने काय करावे आणि काय करू नये, याबाबत त्यांनी काही तत्वे सांगितली आहे. त्यांच्या या तत्वांचे पालन केले तर जीवनातील कोणत्याही अडचणीतून तुम्ही सहजरीत्या बाहेर पडू शकता.

त्यांनी वैवाहिक आयुष्यात लग्नानंतर किंवा लग्नाच्या पूर्वी मुलींच्या काय जबाबदाऱ्या असतात किंवा त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. याबाबत सांगितले आहे. लग्नानंतर सासरच मुलीचं घर बनतं. अशात नवं घर, नवीन लोक तत्यांना समजून घेणं, त्यांच्याशी एकरूप होणं हे एक आव्हानच असतं.

मुलींकडून काही चुका झाल्या तर त्यांना सासरी बरंच काही ऐकावं लागतं. त्यात आई-वडिलांनी काय शिकवलं याकडेही बघितलं जातं. त्यामुळे लग्न होण्यापूर्वीच मुलींनी कोणत्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात, याबाबत चाणक्य यांनी काही धोरणे सांगितली आहेत.

शांत राहणं

लग्नानंतर प्रत्येक मुलगी तिच्या सासरी जाते. लग्नानंतर सासर हेच तिचं घर बनतं. मात्र, कधी-कधी काही गोष्टींवरून तिला बोललं जातं. अशा स्थितित उद्धटपणा किंवा राग अधिक दाखवला तर त्याचा परिणाम हा नात्यांवर होत असतो. त्यामुळे लग्नापूर्वीच आई-वडिलांनी आपल्या मुलींना संयमी राहणं (Chanakya Niti) शिकवायला हवं.

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी

मुलींनी लग्नापूर्वीच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायला हवं. कारण, सासरी कितीही आर्थिक समृद्धी असली तरी मुली आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असायलाच हव्या. यामुळे त्यांना कुणापुढे हाथ नाही पसरावे लागत. त्यांच्यामध्ये देखील एक आत्मविश्वास कायम राहतो.

आत्मसन्मान जपणे

मुलींनी नेहमी आपला आत्मसन्मान जपायला हवा. पती आणि पत्नी यांच्यात सन्मान असायलाच हवा. मुलींनी आपला आत्मसन्मान कधीही कुणाच्या पायी तुडवू देऊ नये. आपला सन्मान आपण कायम राखायचा आणि इतरांनाही कधी तो तुडवू देण्याचा चान्स द्यायचा नाही. आत्मसन्मान हा व्यक्तीचा एल अलंकार असतो. त्याने आपली किंमत असते.

नात्यांची समज

प्रत्येक व्यक्तीकडून (Chanakya Niti) चुका होत असतात. मात्र या चुकातून शिकून पुढे जायला हवं. नात्यातही अनेक चुका होतात.पण, आपण नाते जपायला अधिक प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे नाते टिकून राहते. नात्याची किंमत, ती जपणे या गोष्टी मुलींना शिकवायला हव्या.

वेळ देणे

कोणतेही नाते सहज निर्माण होत नाही. व्यक्तीला आणि नात्याला वेळ दिला की ते उमजत जातात.हळूहळू नाते उलगडत जातात. यामुळे व्यक्तीचीही जाण होते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला वेळ देता आला पाहिजे. आपल्यात तेवढा संयम असायला हवा.

News Title : Chanakya niti girls should learn these things before marriage

महत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! पुण्यातील ‘या’ तालुक्याचं नाव बदललं

‘या’ बड्या अभिनेत्यांचा CAA ला कडाडून विरोध; भाजपला चांगलंच झापलं

यश मिळवायचं असेल तर ‘या’ 3 गोष्टी नक्की करा

शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत!

हरियाणात नाट्यमय घडामोडी; मोठी अपडेट समोर