वाहन मालकांनो प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा होईल मोठं नुकसान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

NHAI List Of FASTag l वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. अगदी काही दिवसांपूर्वी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) Paytm FASTag संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. NHAI पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड (PPBL) ला फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांच्या यादीतून वगळले आहे. अशातच आता रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेवर घातलेल्या बंदीनंतर आयोगाने एक निर्णय घेतला आहे. आयोगाने फास्टॅग पुरवणाऱ्या बँकांची नवीन यादी जारी केली आहे. NHAI ने जारी केलेल्या यादीमध्ये तब्बल 39 बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कार मालक आयोगाने जारी केलेल्या बँकेतूनच FASTag खरेदी करू शकतो.

NHAI List Of FASTag l कार मालक या 39 बँकांमधून FASTag खरेदी करू शकतात! :

एअरटेल पेमेंट्स बँक
अलाहाबाद बँक
एयू स्मॉल फायनान्स बँक
ॲक्सिस बँक लि
बंधन बँक
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ महाराष्ट्र
कॅनरा बँक
त्रिशूर जिल्हा सहकारी बँक
युको बँक
युनियन बँक ऑफ इंडिया
येस बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
सिटी युनियन बँक लि
कॉसमॉस बँक
Dombivli Nagari Sahakari Bank
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
फेडरल बँक
फिनो पेमेंट बँक
एचडीएफसी बँक
आयसीआयसीआय बँक
IDBI बँक
Karur Vysya Bank
कोटक महिंद्रा बँक
लिव्हक्विक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड
नागपूर नागरी सहकारी बँक लि
पंजाब महाराष्ट्र बँक
पंजाब नॅशनल बँक
Saraswat Bank
दक्षिण भारतीय बँक
आयडीएफसी फर्स्ट बँक
इंडियन बँक
इंडियन ओव्हरसीज बँक
इंडसइंड बँक
J&K बँक
कर्नाटक बँक
स्टेट बँक ऑफ इंडिया
सिंडिकेट बँक
द जळगाव पीपल्स को-ऑप. बँक

NHAI List Of FASTag l उद्यापासून पेटीएम फास्टॅग टॉप-अप सुविधा बंद होणार :

फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांच्या यादीतून पेटीएम पेमेंट बँक काढून टाकल्यानंतर आता फास्टॅग खरेदीदार या 39 बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून फास्टॅग खरेदी करू शकतात. जर कोणत्याही पेटीएम फास्टॅग वापरकर्त्याच्या कार्डमध्ये शिल्लक रक्कम असेल तर तो शिल्लक रक्कम संपेपर्यंत ते कार्ड वापरू शकतो. तसेच NHAI आणि RBI च्या माहितीनुसार, 15 मार्चनंतर कोणत्याही पेटीएम फास्टॅगमधील टॉप-अपची सुविधा देखील बंद होणार आहे. यासाठी पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांनी इतर कोणत्याही अधिकृत बँकेतून त्वरित फास्टॅग खरेदी करावे.

News Title : NHAI List Of FASTag

महत्त्वाच्या बातम्या- 

होळीपूर्वी हे शुभ कार्य करणे टाळा अन्यथा घडेल अशुभ घटना

भाजपने मुलाला आधीच दिला होता आदेश, आता बापाचा पत्ता केला कट!

Pune News: पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळताच मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया

Pune Lok sabha: पुण्यात जगदीश मुळीक यांचा हिरमोड, आता काय निर्णय घेणार?

भाजपकडून सुजय विखेंची उमेदवारी जाहीर, दुसरीकडे शरद पवारांचा मोठा डाव?