भाजपनं सुधीर मुनगंटीवरांना बळंच बसवलं घोड्यावर!, इच्छा नसताना होणार का खासदार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sudhir Mungantiwar | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील 20 जागांची घोषणा करून सत्ताधाऱ्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला. नागपूरमधून पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना उमेदवार घोषित करण्यात आलं आहे. त्यांचं नाव पहिल्या यादीत नसल्यानं विरोधकांनी भाजपला घेरलं होतं. उद्धव ठाकरे यांनी तर गडकरींना महाविकास आघाडीत येण्याची ऑफर देत निवडणून आणतो असं जाहीरपणे सांगितलं होतं.

भाजपनं धक्कातंत्र कायम ठेवत काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली, तर काही जागांवर मंत्र्यांना उभं केलं आहे. उत्तर मुंबईतून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना वगळून पियुष गोयल यांच्यावर पक्षानं विश्वास दाखवला. विदर्भातील दहा जागांबाबत पक्ष नेतृत्व काय भूमिका घेतं याकडे सर्वांच्या नजरा होत्या. पण, नितीन गडकरी यांना नागपूरमधून पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. वर्ध्यातून रामदास तडस आणि अकोल्यातून अनुप धोत्रे यांना उमेदवारी मिळाली.

इच्छा नसताना होणार का खासदार?

खरं तर चंद्रपुरातून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. अद्याप काही जागांवरून महायुतीत पेच असल्यानं त्या उमेदवारांची घोषणा झालेली नाही. दुसऱ्या यादीत जाहीर न झालेल्या जागांवरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

विशेष बाब म्हणजे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचा खासदारकीमध्ये अजिबात रस नव्हता. त्यांची दिल्लीत जाण्याची इच्छा नाही, असे त्यांनीच स्पष्ट केले होते. पण, पक्षाच्या आदेशामुळं त्यांना लोकसभा लढवावी लागत आहे. माझं लोकसभेचं तिकीट कापलं जावं, यासाठीच मी प्रयत्न करत असल्याचं विधान त्यांनी मध्यंतरी केलं होतं. अशा परिस्थितीत त्यांना लोकभेसेचं तिकीट देऊन पक्षानं बाजूला सारलं असल्याची चर्चा रंगली आहे. ते खासदारकीसाठी इच्छुक का नाहीत याची कल्पना पक्षाच्या निरीक्षकांना होती, पण जागांचं गणित बसवण्यासाठी मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

Sudhir Mungantiwar यांना उमेदवारी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील वर्धा मतदारसंघातून लोकसभेवर पाठवलं जाऊ शकतं, अशी चर्चा होती. पण, यादीत त्यांचं नाव नसल्यानं जे बावनकुळे करू शकले ते मुनगंटीवार यांना करता आलं नसल्याचा सूर मतदारसंघात आहे. एकूणच सुधीर मुनगंटीवार यांना त्यांच्या इच्छेविरूद्ध लोकसभा निवडणूक लढवावी लागत आहे.

भाजपनं बुधवारी विदर्भातील महायुतीच्या काही प्रमुख जागांवरील उमेदवार जाहीर केले. नागपूरमधून नितीन गडकरी, अकोल्यातून अनुप धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस आणि चंद्रपूरमधून मंत्री सुधीर मुनगंटीवार लोकसभेच्या रिंगणात आहेत. तर, अमरावती, रामटेक, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, बुलढाणा आणि यवतमाळ-वाशिम येथील उमेदवारांची घोषणा अद्याप झाली नाही.

News Title- BJP has announced Sudhir Mungantiwar as its candidate for the Lok Sabha elections from Chandrapur

महत्त्वाच्या बातम्या –

भाजपमुळे अजित पवारांचं टेंशन वाढलं? ; ‘हा’ नेता शरद पवार गटात जाणार?

नाशिकमध्ये उमेदवार राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा?; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा तो साउथ सिनेमा आता या दिवशी OTT वर येतोय?

वाहन मालकांनो प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा होईल मोठं नुकसान

लग्नापूर्वी मुलींनी ‘या’ 5 गोष्टी शिकायलाच हव्या!