नाशिकमध्ये उमेदवार राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा?; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. भाजपच्या दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यातील पहिल्या यादीमध्ये भाजप नेते नितीन गडकरी यांचं नाव नव्हतं, यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केल्या. भाजपची दुसरी यादी कालच जाहीर झाली आहे. यामध्ये अनेक खासदारांचं तिकीट कापण्यात आलं असून नवीन नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच महाविकास आघडीचं अद्यापही कशातच काही नाही. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांना माध्यमांनी विचारले की नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार राष्ट्रवादीचा की शिवसेना ठाकरे गटाचा? यावर संजय राऊत (sanjay Raut) यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये 20 नेत्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र महाविकास आघडीने अद्याप कोणतंच पाऊल उचललं नाही. त्यानंतर नाशिक दौऱ्यावर संजय राऊत (sanjay Raut) गेले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना नाशिकच्या जागेवर दावा गेला आहे. नाशिकची जागा ही शिवसेनेची असणार आहे आणि शिवसेना जिंकून येणार आहे, असं संजय राऊत (sanjay Raut) म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके शरद पवार यांच्यासोबत येणार असल्याच्या चर्चा होत्या, त्यावर राऊत यांनी भाष्य केलं आहे.

निलेश लंके यांच्यावर प्रतिक्रिया

निलेश लंके शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, “शरद पवार हे सगळ्यांचं छत्र आहे. निलेश लंके कुठेच गेले नाहीत. काल मी आणि पवार साहेब एकाच व्यासपीठावर होतो. त्यावेळी निलेश लंके यांच्याशी माजी याविषयावर चर्चा झाली. त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर ते पुन्हा इथे येऊन निवडणूक लढवतील महाराष्ट्र त्यांच्या भूमिकेचे स्वागत करेल”.

“दादरा आणि नगर हवेलीच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावर राऊत यांनी आपली स्पष्टेक्ती दिली आहे. कलाबेन यांचं नाव जरी भाजपच्या उमेदवारीमध्ये असलं तरीही शिवसेनेची ती जागा आणि ती जागा आम्ही जिंकू”, असं संजय राऊत म्हणाले.

भारत जोडो यात्रेवर भाष्य

नंदुरबार धुळे आणि आज नाशिकच्या चांदवडमध्ये ते येत आहेत. त्यानंतर ते येत्या 17 तारखेला मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर भारत जोडो यात्रेचा समारोप होणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे.

महाविकास आघाडी आणि इंडिया हे सर्व एकच आहेत. सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समारोप हा मुंबईच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. स्वत: उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे. राहुल गांधींना उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं आहे. शिवसेना त्यांचं मोठं स्वागत करेल.

News Title – Sanjay Raut On Nashik loksabha Election

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळताच मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया

Pune Lok sabha: पुण्यात जगदीश मुळीक यांचा हिरमोड, आता काय निर्णय घेणार?

भाजपकडून सुजय विखेंची उमेदवारी जाहीर, दुसरीकडे शरद पवारांचा मोठा डाव?

भाजपच्या यादीत पाच महिला, मात्र नवनीत राणांचं टेन्शन वाढलं!

बीडमधून मुंडे कुटुंबाला धक्का, भाजपने घेतला मोठा निर्णय