भाजपमुळे अजित पवारांचं टेंशन वाढलं? ; ‘हा’ नेता शरद पवार गटात जाणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MLA Nilesh Lanke | आगामी लोकसभा निवडणुकांमुळे देशासह राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.त्यातच काल (13 मार्च) भाजपाने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. भाजपाने ही दुसरी यादी जाहीर केली असून यात राज्यातील 20 उमेदवारांची नावे आहेत. मात्र, यानंतर अजित पवार गटातील आमदाराला (MLA Nilesh Lanke) चांगलाच धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे.

भाजपाच्या या यादीचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर झाला आहे. भाजपाने अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिल्याने ही जागा भाजपकडे गेली आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके नाराज झाले आहे.

आमदार निलेश लंके शरद पवार गटात जाणार?

निलेश लंके यांची वाटचाल आता शरद पवार गटाकडे सुरु झाली आहे. आज (14 मार्च) त्यांच्या पक्षप्रवेशाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) हे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, भाजपच्या यादीमुळे त्यांचा हिरमोड झाल्याचं म्हटलं जात आहे.

आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात पक्ष प्रवेश करू शकतात. भाजपाचे सुजय विखे पाटील यांच्याविरुद्ध आता महाविकास आघाडीतून निलेश लंके अशी लढत होण्याची शक्यता आहे. निलेश लंके यांना खासदार अमोल कोल्हे यांनीही मागे जाहीर आमंत्रण दिलं होतं. अहमदनगरला निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित महानाट्याच्या वेळी कोल्हे यांनी महाविकास आघाडीत येऊन तुतारी घेऊन निवडणूक लढण्याचं निमंत्रण दिल होतं. त्याचवेळी प्रशांत जगताप यांनीही यबाबत स्पष्टपणे सांगितलं होतं.

त्यामुळे भाजपची यादी, अमोल कोल्हे आणि प्रशांत जगताप यांची विधाने यामुळे लंके लवकरच शरद पावर गटात जाणार, याची दाट शक्यता आहे. भाजपने यादी जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. याचा परिणाम महायुतीमधील अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यावरही झाला आहे.

महाराष्ट्रातील भाजपा उमेदवारांची यादी

यादीमध्ये खासदार प्रितम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर मुंबई मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना संधी मिळाली आहे. यासोबतच नंदुरबारमधून हिना गावीत, धुळ्यातून सुभाष भामरे, जळगावमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे, अकोल्यातून अनूप धोत्रे, वर्ध्यातून रामचंद्र तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रतापराव पाटील, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीमधून कपिल पाटील, ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर श्रृंगारे, माढ्यातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि सांगलीतून संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

News Title : MLA Nilesh Lanke likely to join Sharad Pawar group

महत्त्वाच्या बातम्या –

Pune News: पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळताच मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया

Pune Lok sabha: पुण्यात जगदीश मुळीक यांचा हिरमोड, आता काय निर्णय घेणार?

भाजपकडून सुजय विखेंची उमेदवारी जाहीर, दुसरीकडे शरद पवारांचा मोठा डाव?

भाजपच्या यादीत पाच महिला, मात्र नवनीत राणांचं टेन्शन वाढलं!

बीडमधून मुंडे कुटुंबाला धक्का, भाजपने घेतला मोठा निर्णय