राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ भागांना यलो अलर्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather update | राज्यात हवामान विभागाने पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील तापमानात वाढ होत असल्याने उकाडा वाढला आहे. आता त्यातच पावसाचा इशारा ( Maharashtra Weather update) देण्यात आला आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कमाल तापमानात वाढ होताना दिसून आली. त्यामुळे आता दिवसा घराबाहेर पडायलाही त्रास होत आहे. उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. मात्र, पहाटे आणि रात्री तापमानात घट होत असल्याने गारवा जाणवत आहे. अशात पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

16 ते 19 मार्च दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहणार आहे. मागच्या महिन्यात तर विदर्भामधील अनेक भागांमध्ये गारपीट देखील झाली होती. यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.

‘या’ भागांना यलो अलर्ट

सततच्या वातावरणीय बदलामुळे थंडी तापाच्या रुग्णात वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या देखील वाढत आहेत. आता हवामान विभागाने अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. 16 ते 19 मार्च या तीन दिवसांत या भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नागपूरमध्ये तापमान वाढलं

राज्यातील नागपूरमध्ये ( Maharashtra Weather update) सध्या पारा चढायला लागला आहे. विदर्भामध्ये उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. नागपूरचे तापमान 38 अंश सेल्सियसवर तर विदर्भातील काही शहरात 39 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे घामाच्या धारा वाहायला सुरुवात झाली आहे.

त्यातच आता अवकाळी पावसाचा देखील सामना करावा लागणार आहे. बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांनाच बसला आहे. पाऊस आणि गारपीटमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आता पुन्हा पाऊस पडणार म्हटल्यावर या चिंतेत भर पडली आहे.

News Title : Maharashtra Weather update

महत्त्वाच्या बातम्या –

वाहन मालकांनो प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा होईल मोठं नुकसान

लग्नापूर्वी मुलींनी ‘या’ 5 गोष्टी शिकायलाच हव्या!

होळीपूर्वी हे शुभ कार्य करणे टाळा अन्यथा घडेल अशुभ घटना

भाजपने मुलाला आधीच दिला होता आदेश, आता बापाचा पत्ता केला कट!

Pune News: पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळताच मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया