मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, वाचा आजचे दर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold-Silver Rate Today | गेल्या आठवड्यात सोने-चांदीने ग्राहकांचा खिसा चांगलाच खाली केला. सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आज (14 मार्च) काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज सोने आणि चांदीच्या किमती उतरल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा (Gold-Silver Rate Today) दिलासा मिळाला आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मौल्यवान धातूच्या किमती वाढताना दिसल्या. 1 मार्चपासून ते 10 मार्चपर्यंत 3,430 रुपयांनी भाव वाढले. या आठवड्यामध्ये मात्र याला ब्रेक लागला. 10-11 मार्च रोजी किंमती स्थिर राहिल्या. 12 मार्च रोजी किंमती फक्त 10 रुपयांनी कमी झाल्या.

13 मार्च रोजी यामध्ये 420 रुपयांची घसरण झाली. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA)नुसार आजच्या किमती ठरल्या आहेत. त्यानुसार आता 22 कॅरेट सोने 60,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,900 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

चांदीचा ग्राहकांना दिलासा

चांदीनेही ग्राहकांना दिलासा दिला आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच चांदीच्या किमतीमध्ये 3 हजारांची वाढ झाली. 12 मार्च रोजी 500 रुपयांनी त्यात (Gold-Silver Rate Today) दरवाढ झाली. तर, 13 मार्च रोजी 900 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 75,200 रुपये आहे.

‘असा’ असेल कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 65,335 रुपये, 23 कॅरेट 65,073 रुपये, 22 कॅरेट सोने 59,847 रुपये झाले.18 कॅरेट 49,001 रुपये, 14 कॅरेट सोने 38,221 रुपये प्रति 10 ग्रॅमवर (Gold-Silver Rate Today) पोहचले आहे.

वायदे बाजारामध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कोणताही कर आणि शुल्क लावले जात नाहीत. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असतात.

News Title : Gold-Silver Rate Today 14 March

महत्त्वाच्या बातम्या –

वाहन मालकांनो प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा होईल मोठं नुकसान

लग्नापूर्वी मुलींनी ‘या’ 5 गोष्टी शिकायलाच हव्या!

होळीपूर्वी हे शुभ कार्य करणे टाळा अन्यथा घडेल अशुभ घटना

भाजपने मुलाला आधीच दिला होता आदेश, आता बापाचा पत्ता केला कट!

Pune News: पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळताच मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया