मुंबईने विदर्भाला चारली धूळ; 42 व्या जेतेपदावर कोरलं नाव

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ranji Trophy Winner l मुंबईने पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. मुंबईने अंतिम फेरीत विदर्भाचा 169 धावांनी पराभव करून हे यश संपादन केले आहे. मुंबईने विदर्भासमोर 538 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ते गाठण्यात विदर्भाचा संघ अपयशी ठरला. त्यामुळे मुंबईने रणजी इतिहासात आणखी एक विजयचा तुरा रोवला आहे. मुंबई संघाचे हे 42वे रणजी विजेतेपद आहे.

Ranji Trophy Winner l मुंबईने विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला! :

विदर्भाचा पराभव करून मुंबईने रणजी करंडक स्पर्धेतील विजेतेपदाची 9 वर्षांची प्रतीक्षा देखील संपवली आहे. 2015-16 नंतर मुंबईच्या संघाने मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. विदर्भाबद्दल बोलायचे झाले तर रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी खेळण्याची ही तिसरी वेळ होती. याआधी झालेल्या दोन्ही फायनलमध्ये त्याने विजय मिळवला होता. पण यावेळी तो चॅम्पियन होऊ शकला नाही आणि ट्रॉफी मुंबईकडे गेली आहे.

रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ दुसऱ्या डावात केवळ 368 धावाच करू शकला आणि विजयाच्या लक्ष्यापासून 169 धावा दूर राहिला. मुंबईकडून दुसऱ्या डावात तनुष कोटियनने सर्वाधिक 4 बळी घेतले. तसेच विदर्भासाठी ए. वाडकरने शतक झळकावले आहे. याशिवाय करुण नायर आणि हर्ष दुबे यांनी देखील अर्धशतके झळकावली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाहीत.

Ranji Trophy Winner l खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे मुंबई रणजी चॅम्पियन ठरली :

मुंबईसाठी दुसऱ्या डावात मुशीर खानने शतक झळकावले व खराब फॉर्ममधून परतलेल्या अजिंक्य रहाणेने 73 धावा आणि श्रेयस अय्यरने 95 धावा केल्या. याशिवाय शम्स मुलानीनेही अर्धशतक झळकावले आहे आणि परिणामी मुंबईने 418 धावा केल्या.

अशातच मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दाखल विदर्भ संघाची अवस्था आणखीनच बिकट झाली आणि पहिल्या डावात अवघ्या 105 धावाच करू शकला, त्याचे परिणाम त्यांना सामन्यात नंतर भोगावे लागले आहेत.

News Title : Mumbai Win Ranji Trophy 2024

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, वाचा आजचे दर

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ भागांना यलो अलर्ट

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती चिंताजनक!

भाजपनं सुधीर मुनगंटीवरांना बळंच बसवलं घोड्यावर!, इच्छा नसताना होणार का खासदार?

आजपासून खरमास सुरू, पुढील 30 दिवस चुकूनही शुभ कार्य करू नये